महिला दिनी अमृता फडणवीस यांचं नवीन गाणं लॉन्च

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 8 मार्च 2021

केवळ जीवन जगते आहे असे नाही, तर स्वातंत्र्याने परिपूर्ण असे स्त्रीजीवनाचे अस्तित्व असले पाहिजे.

मुंबई : भाजप नेते आणि राज्यातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचं नवीन गाणं महिला दिनाच्या मुहुर्तावर आलं आहे.‘’भावनांच्या खेळामध्ये गडगडले मी गडबडले ... गडगडले मी गडबडले, कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी.. कुणी म्हणाले या जगतातील हीच लुळी पांगळी...’’ असे या गाण्याचे बोल आहेत. हे नाट्य संगीतावर आधारीत गीत सादर करते आहे. आज जागतिक महिला दिनानिमित्त फक्त तुमच्यासाठी असं अमृता फडणवीसांनी ट्विट करुन सांगितलं होतं.

तापसी-अनुरागने चित्रीकरणाला केली सुरुवात?

अमृता फडणवीसांनी रविवारी त्यांनी एक ट्विट केलं होतं, ''केवळ जीवन जगते आहे असे नाही, तर स्वातंत्र्याने परिपूर्ण असे स्त्रीजीवनाचे अस्तित्व असले पाहिजे. ह्य़ा विषयावर माझे विषय मांडते आणि ह्याच बाबत स्त्री शक्तीवर आधारित डॉ. रखमाबाई चित्रपटाचे माझे गीत नक्की पाहा एका 8 मार्चला अंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त'' असं आवाहन अमृता फडणवीस यांनी केलं होतं.

 

''जेव्हा ती संघर्षाच्या मार्गावर निघाली तेव्हा तिला कुणी वेडी म्हणाले कुठली, कुणी म्हणाले खुळी ... तिने मात्र जगाला दाखवून दिले की, तिच्य़ा प्रगतीचा प्रवाह रोखने शक्य नाही. स्त्री शक्तीला गौरवप्रधान करणारं माझं नवीन गीत नक्की पहा’’ असंही त्यांनी ट्विट केलं आहे. 

 

संबंधित बातम्या