'रामसेतू' चा आयोध्येत शुभारंभ, अक्षय कुमारने फोटो केले शेअर

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 18 मार्च 2021

आज श्री आयोध्येत ‘राम सेतु’  सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात करण्याआगोदर भगवान श्री रामाचा आशिर्वाद मिळाला आहे.

अयोध्या:(Launch of Ramsetu in Ayodhya shared by Akshay Kumar) गेल्या काही दिवसांपासून अक्षय कुमारच्या 'राम सेतू' या सिनेमाची चर्चा चांगलीच रंगली आहे. या सिनेमाच्या शूटिंगची सुरुवात करण्यासाठी अभिनेता अक्षय कुमार आयोध्येला रवाना झाला आहे. अक्षय कुमारसोबत अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि नुसरत भरुचा या दोघींदेखील आयोध्येला गेल्या आहेत. आयोध्येत गेल्यानंतर त्यांनी काय काय केले यासंबंधीचे फोटो अक्षयने सोशल मिडियावर शेअर केले आहेत.

अक्षयने ट्विटरवरुन ट्विट करत एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये प्रभू रामचंद्रांची आरती सुरु असल्याचे दिसत आहे. ‘’आज श्री आयोध्येत ‘राम सेतु’ सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात करण्याआगोदर भगवान श्री रामाचा आशिर्वाद मिळाला आहे. जय श्री राम!’’ अशा आशयाचे कॅप्शन अभिनेता अक्षय कुमारने या फोटोला दिले आहे. (Launch of Ramsetu in Ayodhya shared by Akshay Kumar)

सोनूचा चाहत्याला अजब मंत्र म्हणाला, ‘मुलगी शोधायची मेहनत तुम्ही घ्या’

राम सेतू चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार सोबत जॅकलिन फर्नांडिस, नुसरत भरुचा या दोघी दिसणार आहेत. भारतीय संस्कृती आणि परंपरा तसेच भारताचं प्राचीन काळातील महत्त्व.भारताचा समृध्द वारसा यावरती भाष्य करणारा हा चित्रपट आहे.

 

संबंधित बातम्या