नाईट पार्टीसाठी गेलेल्या प्रियांकाच्या मागे लागली लेस्बियन म्हणाली...

गोमंन्तक वृत्तसेवा
सोमवार, 24 मे 2021

आता प्रियांकाचा आणखी एक मजेदार किस्सा समोर आला आहे.

बॉलिवूडमधील प्रसिध्द अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत असते. आता प्रियांकाचा आणखी एक मजेदार किस्सा समोर आला आहे. 2014 मध्ये प्रियांका चोप्राने करण जोहरच्या (Karan Johar) 'कॉफी विथ करण' (Koffee With Karan) या टॉक शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी चर्चेदरम्यान प्रियांकाने सांगितले की, तिला एका लेस्बियन (Lesbian) महिलेने प्रपोज केले होते. त्यावेळी प्रियांकाने या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी  एक शक्कल लढवली होती. (The lesbian said after Priyanka who went for night party) 

'कॉफी विथ करण' या शोमध्ये प्रियांकासोबत बॉलिवूडची मस्तानी दिपिका पदुकोणने (Deepika Padukone) हजेरी लावली होती. त्यावेळी करण जोहरने प्रियांकाला प्रश्न विचारला असता, ''एखाद्या परिस्थितीमधून बाहेर पडण्यासाठी तु दुसऱ्या कोणाला तरी डेट करत आहे असं कधी सांगितलं आहे का?'' यावर प्रियांकाने तिला आलेला एक अनुभव या शो दरम्यान सांगितला. काही वर्षापूर्वी मी एका नाईट क्लबमध्ये गेले होते. तिथे एक महिला होती, तिला माझ्याबद्दल काहीही माहिती नव्हते. ती जो विचार करत होती तशी मी नाही. माझं लक्ष तिच्याकडे वेधण्यासाठी ती महिला खूप प्रयत्न करत होती,'' असं प्रियांकाने सांगितले.

37 व्या वर्षी श्रेया बनली आई; बॉलिवूडच्या या अभिनेत्रींना लग्नानंतर अनेक...

करण देखील या महिलेला चांगलाच ओळखतो म्हणत प्रियांका पुढे म्हणाली, ''मी तिला त्यावेळी सांगितले की, बेब माझा बॉयफ्रेंड आहे, मात्र त्यावेळी माझा बॉयफ्रेंड नव्हता. मला मुलांना डेट करायला आवडते, असं मला तिला सांगायचं होतं.''

प्रियांका चोप्राचा 'द व्हाइट टायगर' हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये प्रियांकासबोत मुख्य भूमिकेत प्रसिध्द अभिनेता राजकुमार राव आणि आदर्श  गौरव होते. या चित्रपटामधील तिच्या भूमिकेसाठी खूप कौतुक करण्यात आले होती.

सध्या प्रियांका चोप्रा लंडनमध्ये रुसो ब्रदर्सच्या 'सिटाडेल' या वेबसिरिजच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. 'सिटाडेल' मध्ये हॉलिवूड अभिनेता रिचर्ड मॅडनसोबत प्रियांका दिसणार आहे. प्रियांका गेल्या वर्षी 'टेक्स फॉर यू' चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी लंडन गेली होती.
 

संबंधित बातम्या