20 वर्षानंतर Gadar 2 मध्ये अमीषा पटेल आणि सनी देओलची दिसणार लव्ह स्टोरी

'गदर-2' (Gadar-2) या चित्रपटाचे (Movie) शूटिंग हिमाचल प्रदेशमध्ये सुरू आहे.
20 वर्षानंतर Gadar 2 मध्ये अमीषा पटेल आणि सनी देओलची दिसणार लव्ह स्टोरी
20 वर्षानंतर Gadar 2 मध्ये अमीषा पटेल आणि सनी देओलची दिसणार लव्ह स्टोरीInstagram/@ameeshapatel9

बॉलीवुड (Bollywood) अभिनेत्री अमीषा पटेल (Ameesha Patel) पुन्हा एकदा बॉलीवुड कमबॅक केले आहे. तिने अभिनेता सनी देओलसोबत (Sunny Deol) तिच्या आगामी 'गदर 2' (Gadar -2) या चित्रपटाचे शूटिंग (Shooting) सुरू केले आहे. अमीषाने तीच्या अधिकृत इंस्टाग्राम (Instagram) अकाऊंटवर शूटिंगमधील एक फोटो (Photo) शेअर (Share) केला आहे. फोटोमध्ये अमीषा-सनी पुन्हा एकदा तारा सिंह -सकीनाच्या गेटअपमध्ये दिसत आहे. या दोघांचा फोटो समोर येताच सोशल मिडियावर (Social Media) व्हायरल (Viral) झाला आहे. अमीषाने (Ameesha Patel) शेअर केलेल्या या पोस्टवर (Post) चाहत्यांनी (Comments) कॅमेन्ट आणि लाईक्सचा (Likes) वर्षाव केला आहे. या चित्रपटाचे (Movie) शूटिंग हिमाचल प्रदेशमध्ये सुरू आहे.

चित्रपटाच्या (Movie) शूटिंग सेटवरील फोटो (Photo) शेअर करतांना अमीषाने (Ameesha Patel) कॅप्शनमध्ये लिहिले- गदर 2 (Gadar-2) मुहूर्त शॉट. यासोबत त्यांनी आर्मी जनरल सुरेन्द्र सिंग आणि रोहित जायके यांना टॅग (Tag) केले आणि शूटिंग सेटवर वेळ घालवल्याबद्दल त्यांचे आभार मानले. फोटोमध्ये (Photo) अमीषा (Ameesha Patel) पांढऱ्या रंगाचा सूट आणि पिवळ्या दुपट्ट्यात दिसत आहे. त्याचवेळी त्याच्या शेजारी बसलेला सनी देओल (Sunny Deol) डोक्यावर फेटा बांधून दुसरीकडे पाहत आहे. बाकी टीमसोबत फोटोमध्ये (Photo) आर्मी ओफिसर्सही दिसत आहेत.

दिग्दर्शक अनिल शर्मा

अनिल शर्मा यांनी सोशल मिडिया (Social Media) अकाऊंटवर चाहत्यांना चित्रपटाबाबत (Movie) माहिती देणारा एक व्हिडिओ (Video) शेअर केला होता, ज्यामध्ये ते चाहत्यांना संगत आहेत की त्यांच्या टीमने गदर -2 (Gadar-2) चे शूटिंग सुरू केले आहे. गदार-2 या चित्रपटात सनी देओल (Sunny Deol) , अमीषा पटेलशिवाय उत्कर्ष शर्मा दिसणार आहे. 'गदर' (Gadar) हा सनी देओल (Sunny Deol) आणि अमीषाच्या कारकीर्दीतील सर्वात यशस्वी चित्रपट (Movie) आहे, ज्याचा सिक्वेलने त्यांना चित्रपटगृहांमध्ये पुन्हा इतिहास रचायचा आहे. 'गदर 2' (Gadar-2) हा चित्रपट 2022 मध्ये सिनेमगृहांमध्ये रिलीज (Release) होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com