Madhubala Biopic बनवल्यास होणार कायदेशीर कारवाई, मधूबालांच्या बहिणीची निर्मात्याला धमकी

चित्रपट निर्माते टुटू शर्मा यांनी मधुबाला यांच्या बायोपिक 'मधुबाला: दर्द का सफर'चे कॉपीराइट घेतले होते.
Madhubala
MadhubalaDainik Gomantak

Madhubala Biopic: खरं तर, बॉलिवूडमध्ये अनेक अप्रतिम अभिनेत्री झाल्या आहेत. पण मधुबालासारखं कुणीच नव्हतं. 'मुगल-ए-आझम' सारख्या भव्य चित्रपटात दिसलेल्या मधुबालाने आपल्या कारकिर्दीत खूप उंची गाठली. पण, त्यांनी अल्पावधीतच जगाचा निरोप घेतला.

काही दिवसांपूर्वी पद्मिनी कोल्हापुरे यांचे पती आणि चित्रपट निर्माते टुटू शर्मा (Pradeep Sharma) यांनी मधुबाला यांच्या बायोपिक 'मधुबाला: दर्द का सफर'चे कॉपीराइट घेतले होते. ते मधुबालावर चित्रपट बनवण्याच्या तयारीत आहे. ही बातमी आल्यानंतर मधुबालाची बहीण मधुर भूषण यांनी आक्षेप घेतला होता. जर हा चित्रपट बनवला तर ती निर्मात्यांविरुद्ध कायदेशीर पावले उचलेल, असे मधुरने सांगितले होते. आता यावर टुटू शर्मा यांची प्रतिक्रिया आली आहे.

Madhubala
Karan Kundra-Tejaswi Prakash : करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश लवकरच लग्न करणार? करण म्हणाला...

'ई टाईम्स'शी बोलताना टुटू शर्मा म्हणाले की, 'मी बायोपिक चित्रपट बनवण्याची घोषणा केली आहे. हे मिस सुशीला कुमारी यांनी लिहिलेल्या मधुबाला: दर्द का सफर या चरित्रात्मक पुस्तकावर आधारित आहे. हे पुस्तक अनेक वर्षांपासून सार्वजनिक क्षेत्रात आहे. मधुबाला एक प्रसिद्ध सार्वजनिक व्यक्तिरेखा होत्या. त्याची कथा लोकांना दाखवायला हवी असे मला वाटते. मला वाटते की कायद्यात हे स्पष्ट झाले आहे की तुम्ही सार्वजनिक व्यक्तीच्या जीवनाचा कॉपीराइट करू शकत नाही.'

ते पुढे म्हणाले, 'असे काही घडले असते तर प्रसिद्ध व्यक्तींवर बनवलेले इतके बायोपिक आम्हाला पाहायला मिळाले नसते. आतापर्यंत जेवढे दावे केले जात आहेत. ते निरुपयोगी आहेत आणि माझी कायदेशीर टीम त्यावर उपाय काढत आहे. या 'पुस्तकात जे काही दाखवले आहे ते मी प्रेक्षकांसमोर माडण्याचा प्रयत्न करेन.'

Madhubala
उपासना सिंहने मिस युनिव्हर्स हरनाज कौर संधूवर लावले 'हे' आरोप

मधुबाला यांची बहीण मधुर भूषण बद्दल बोलायचे झाले तर त्यांना एका मुलाखतीत सांगितले होते की, 'जर चित्रपट न बनवण्याचे त्यांचे म्हणणे मान्य झाले नाही तर त्या कायदेशीर कारवाई करेल. जो कोणी असे चित्रपट बनवतो त्याला कोर्टात खेचले पाहिजे. मी एक योद्धा आहे, यासाठी लढत राहिन.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com