'जगातील सर्वात सुंदर स्त्री...' म्हणत डॉ. नेनेंनी दिल्या माधुरीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Madhuri Dixit Birthday special: डॉ. नेनेंनी माधुरीच्या वाढदिवसानिमित्त एक खास फोटो शेअर केला आहे.
'जगातील सर्वात सुंदर स्त्री...' म्हणत डॉ. नेनेंनी दिल्या माधुरीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
Dr Shriram NeneInstagram

बॉलीवूडची धक धक गर्ल माधुरी दीक्षितसाठी आज तिचा 55 वा वाढदिवस साजरा करत आहे. डॉ. नेनेंनी माधुरीच्या वाढदिवसानिमित्त सोशल मिडियावर एक खास फोटो शेअर केला आहे. तसेच माधुरीला देशभरातील चाहते तिला खूप प्रेम आणि शुभेच्छा देत आहेत आणि धक धक गर्लचा वाढदिवस खास बनवत आहेत. (Madhuri Dixit Birthday special news)

* डॉ. नेनेंची खास पोस्ट

डॉ श्रीराम नेने यांनी माधुरीच्या वाढदिवसानिमित्त इन्स्टाग्रामवर खास पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी माधुरीसोबत एक सुंदर फोटो शेअर करत लिहिले की "जगातील सर्वात सुंदर स्त्री, माझा जिवलग मित्र, वाढदिवसाचे खूप शुभेच्छा". माधुरीला देशभरातून वाढदिवसाच्या शुभेच्छा येत आहे. नवऱ्याच्या या प्रेमळ पोस्टवर माधुरीनेही आपल्या प्रेमाची उधळण केली आहे. या पोस्टवर अभिनेत्रीने हार्ट इमोजीसह प्रतिक्रिया दिली आहे. त्याचवेळी, डॉक्टर नेने यांच्या या पोस्टवर माधुरीचे अनेक चाहते तिला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा देत आहेत.

या फोटोमध्ये माधुरी दीक्षितने सुंदर साडी परिधान केली असून नेकलेस आणि मॅचिंग कानातले घालून तिच्या सौंदऱ्यांमद्धे भर पडली आहे. तर श्रीराम नेने यांनी काळ्या रंगाचा सूट परिधान केला आहे. माधुरी आणि श्रीराम नेने एकमेकांकडे प्रेमाने आणि आपुलकीने पाहत असल्याने दोघांचेही एकमेकांवर किती प्रेम आहे हे स्पष्ट होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.