जेवणाचे निमंत्रण नाकारल्याने विद्या बालनचे शुटिंग बंद पाडल्याचा मध्य प्रदेशच्या मंत्र्यावर आरोप

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 29 नोव्हेंबर 2020

विद्याने बालनने जेवणाचे आमंत्रण नाकारल्यानंतर मंत्री विजय शहा यांनी चित्रपटाचे शूटिंग बंद केल्याचा आरोप आहे. मात्र, त्यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे. 

भोपाल : अभिनेत्री विद्या बालन सध्या तिच्या आगामी ‘शेरनी’ चित्रपटासाठी मध्य प्रदेशात शुटिंग करत आहे. राज्याच्या वनक्षेत्रात गेल्या महिनाभरापासून हे शूटिंग चालले आहे पण यापुढे या चित्रपटाचे शूट सुरू ठेवण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. विद्याने बालनने जेवणाचे आमंत्रण नाकारल्यानंतर मंत्री विजय शहा यांनी चित्रपटाचे शूटिंग बंद केल्याचा आरोप आहे. मात्र, त्यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे. 

 

मंत्री विजय शहांनी विद्याला जेवणाचे निमंत्रण दिले होते. विद्या बालनने हे निमंत्रण नाकारले. त्यानंतर शूटिंगचा परवाना रद्द करण्यात आला.अभिनेत्री विद्या बालनच्या आगामी चित्रपटाच्या निर्मिती पथकाच्या वाहनांना शूटिंगसाठी जंगलात जाण्यापासून रोखलं गेलं आहे. मध्य प्रदेशचे मंत्री विजय शहा यांचे जेवणाचे आमंत्रण नाकारल्याने हे घडवून आणल्याची चर्चा आहे.

 

अधिक वाचा :

यामुळे दीपिकाने तिच्या प्रोफाइलचे नाव बदलून ठेवले तारा 

 

संबंधित बातम्या