राष्ट्रीय पुरस्कारांत महाराष्ट्र

आपली संस्कृती आणि परंपरा यांना धक्का लागेल, अशी कोणतीही गोष्ट सिनेमा क्षेत्राने करू नये.
राष्ट्रीय पुरस्कारांत महाराष्ट्र
राष्ट्रीय पुरस्कारांत महाराष्ट्रDainik Gomantak

चित्रपटसृष्टीतील प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळा काल पार पडला. या सोहळ्यात प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच 67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण नायडू यांच्या हस्ते करण्यात आले.

या सोहळ्याला माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर, राज्यमंत्री एस. मुरुगन, माहिती आणि केंद्रीय सचिव अपूर्व चंद्रा, परीक्षक मंडळाचे अध्यक्ष एन. चंद्रा, कथाबाह्य चित्रपट ज्युरी अध्यक्ष अरुण चढ्ढा आदी यावेळी उपस्थित होते.

राष्ट्रीय पुरस्कारांत महाराष्ट्र
रजनिकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार

राष्ट्रीय पुरस्कारांत महाराष्ट्र

दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेता रजनीकांत यांना प्रदान करण्यात आला. आनंदी गोपाळसाठी समीर विद्वांस यांना रजत कमळ, ताज महाल या मराठी चित्रपटालाही रजत कमळ प्रदान करण्यात आले. सर्वोत्कृष्ट मुलांचा चित्रपट म्हणून कस्तुरी या हिंदी चित्रपटाला सुवर्ण कमळ प्रदान करण्यात आले. या चित्रपटाचे दिग्दर्शक विनोद कांबळे आणि निर्माती पायल डोके यांचा गौरव करण्यात आला. आणि हिंदी सिनेसृष्टातील कलाकार मनोज वाजपेयी (भोसले), कंगणा राणावत (मनिकर्णिका) यांना उत्कृष्ट अभिनयासाठी गौरविण्यात आले.

राष्ट्रीय पुरस्कारांत महाराष्ट्र
.. आता 'IFFI महोत्सव' पडणार महागात!

सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट बार्डोचा गौरव करणात आला. निर्माता- ऋतुजा गायकवाड दिग्दर्शक भीमराव मोरे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. उत्कृष्ट शोध चित्रपटाचा पुरस्कार जक्कल या चित्रपटाला प्रदान करण्यात आला.

त्यासाठी प्रतिक सुरेश जोशी, विवेक वाघ यांचाही सन्मान करण्यात आला. पिकासो या चित्रपटासाठी अभिषेक मोहन वारंग विशेष प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

लता भगवान करे : एक संघर्ष गाथा या चित्रपटासाठी लता करे यांना, ‘खिसा’या कलात्मक चित्रपटासाठी दिग्दर्शक राज प्रीतम मोरे, संतोष मिठाणी यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

लेखक अशोक राणे यांना ‘चित्रपट पाहिलेला माणूस’ या पुस्तकासाठी विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com