Mahashivaratri 2021: सोनू सुद वर का भडकले शिवभक्त; युजर्स म्हणाले, हिंदू धर्माबद्दल विनामूल्य ज्ञान देऊ नको

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 11 मार्च 2021

इंटरनेटच्या दुनियेत सोनू सूदच्या मदतीचेही खूप कौतुक होत आहे, पण महाशिवरात्रीच्या दिवशी अचानक सोनू सूद सोशल मीडियावर ट्रोल होऊ लागला आहे.

मुंबई: बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने यापूर्वी गरजू लोकांना मदत करण्यासाठी बरीच प्रसिध्दी मिळविली आहे. हेच कारण आहे की लोक सोशल मीडियावर सोनू सूदच्या कौतुकाच्या कमेंट वाचताना दिसतात. इंटरनेटच्या दुनियेत सोनू सूदच्या मदतीचेही खूप कौतुक होत आहे, पण महाशिवरात्रीच्या दिवशी अचानक सोनू सूद सोशल मीडियावर ट्रोल होऊ लागला आहे.

सोशल मीडियावर पोस्ट केल्याने सोनू सूद इतका अस्वस्थ झाला आहे की #WeTheHellAreUSonuSood हा ट्विटरवर ट्रेंड होऊ लागला आहे. वास्तविक असे झाले की सोनू सूदने महाशिवरात्रीवर केलेल्या ट्विटने शिवभक्त संतापले आहे. ज्यानंतर लोक त्यांना तीव्रपणे खरीखोटी सुनावत आहेत. सोनू सूदने आपल्या ट्विटमध्ये शिव भगवान की फोटो फॉरवर्ड करके नहीं किसी की मदद करके महाशिवरात्रि मनाएं. ओम नमः शिवाय.’ लिहिले आहे.

 

सोनूच्या याच ट्विटवर लोक भडकले आणि त्यांनी #WhoTheHellAreUSonuSood या हॅशटॅगनसह त्यांच्यावर तिव्र कमेंट होत आहे. याचाच परिणाम म्हणून एका युजर्सने सोनूवर चिडून असे लिहिले की, 'कृपया आम्हाला हिंदू धर्माबद्दल विनामूल्य ज्ञान देऊ नका. हे खरोखर खूप लाजीरवाणी बाब आहे. त्याचवेळी काही युजर्सनी सोनू सूदच्या जुन्या ईदच्या निमित्त केलेल्या ट्विटचा स्क्रीनशॉट घेऊन त्यांला ट्रोल करण्यास कोणतीही कसर सोडली नाहीये.

लग रहा हूं न मजनू भाई की पेंटिंग जैसा म्हणत विक्की कौशलने केला असा काही स्टंट 

“एवढे अफाट ज्ञान कोठून आणता… तेही फक्त हिंदू सणांवर. माझा धर्म माझी इच्छा आहे,” अशी कमेंट एकाने केली आहे. 'लॉकडाऊन दरम्यान तुम्ही लोकांना मदत केली हे चांगले आहे, पण त्यांनी हिंदूंना उत्सव कसा साजरा करायचा हे सांगण योग्य नाही. हा अधिकार त्याला कोणी दिला? असे प्रश्न ही उपस्थित केले आहे.

 

संबंधित बातम्या