Pushpa The Riseवर ट्विट केल्याने महेश बाबूंचा फॅन्सने घेतला क्लास

अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांच्या Pushpa The Riseने जगभरातील बॉक्स ऑफिसवर 300 कोटींहून अधिक कमाई केली आहे
Allu Arjun Pushpa The Rise

Allu Arjun Pushpa The Rise

Dainik Gomantak

अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) यांच्या 'पुष्पा द राइज (Pushpa The Rise: Part 1) या चित्रपटाने काही दिवसांत बॉक्स ऑफिसवर कमाई केली आहे. या चित्रपटाने जगभरात अनेक विक्रम मोडले आहेत. आतापर्यंत, या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर 300 कोटींहून अधिक कमाई केली आहे आणि बॉलीवूडसह अनेक बाजारपेठांमध्ये एक नवीन उदाहरण प्रस्थापित केले आहे. पण आता साऊथ स्टार महेश बाबू (Mahesh Babu) या चित्रपटावर ट्विट केल्याने ट्रोल होत आहे.

<div class="paragraphs"><p>Allu Arjun Pushpa The Rise</p></div>
अक्षय कुमारचा 'पृथ्वीराज' हा चित्रपट रिलीजपूर्वीच वादाच्या भोवऱ्यात

महेशबाबू यांनी कौतुक केले

या चित्रपटाच्या टीमला आणखी एक गोल्डन सरप्राईज मिळाले जेव्हा तेलुगू सुपरस्टार महेश बाबूने चित्रपटाचे कौतुक केले. महेश बाबू यांनी नुकताच हा चित्रपट पाहिला आणि या चित्रपटाबद्दलची त्याची प्रतिक्रिया सोशल मीडियावर शेअर केली. महेशने ट्विट केले की, 'पुष्पाच्या भूमिकेत अल्लू अर्जुन जबरदस्त, अनोखा आणि सनसनाटी दिसत आहे... अप्रतिम कामगिरी. सुकुमारने पुन्हा एकदा सिद्ध केले की त्याचा सिनेमा खरा, देसी आणि प्रामाणिक आहे... एक त्या सिनेमांची एक वेगळीच लेवल आहे.'

चाहते का नाराज आहेत?

महेश आणि अर्जुनच्या चाहत्यांनी त्याच्या फनी स्टाइलचे कौतुक केले. पण महेशला यात चित्रपटाची लीड अॅक्ट्रेस रश्मिका मंदान्नाचा समावेश न केल्यामुळे ट्रोल करणारे काहीजण होते. काही नेटकऱ्यांनी अभिनेत्याच्या ट्विटवर रश्मिकाची स्तुती केली नसल्याने महेश बाबूचा क्लास घेतला.

<div class="paragraphs"><p>Allu Arjun Pushpa The Rise</p></div>
हॉलिवूडचे प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक Peter Bogdanovich होते चित्रपट पत्रकार

महेश बाबू कोरोना पॉझिटिव्ह

काल रात्री महेश बाबू यांचा कोविड 19 चा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यांनी ही बातमी ट्विटरवर शेअर केली आहे. महेश यांनी ट्विट केले की, 'आवश्यक खबरदारी घेतल्यानंतरही, त्याला सौम्य लक्षण जाणवलेकोविड-19 चा त्रास होत असल्याने मी टेस्ट केली आणि ती पॉझीटिव्ह आली. मी स्वत:ला घरीच क्वॉरंटाइन करून घेतले आहे.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com