Prithviraj चित्रपटाचे शीर्षक बदलणार का मेकर्स?

अक्षय कुमारच्या पृथ्वीराज या चित्रपटाच्या निर्मात्यांना करणी सेनेचे सदस्य भेटले आहेत आणि त्यांच्या मागणीनुसार निर्माते मागणीनुसार चित्रपटाचे शीर्षक बदलू शकतात.
Prithviraj चित्रपटाचे शीर्षक बदलणार मेकर्स?

Prithviraj चित्रपटाचे शीर्षक बदलणार मेकर्स?

Dainik Gomantak

अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि मानुषी छिल्लर (Manushi Chhillar) यांच्या पृथ्वीराज या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाचा (Movie) टिझर रिलीज (Release) झाला असून हा चित्रपट सध्या वादात सापडला आहे. या चित्रपटाला करणी सेनेचा विरोध आहे. त्यांनी या चित्रपटाच्या टायटला विरोध केला आहे. या चित्रपटाचे टायटला बदलले पाहिजे, असे ते अनेक दिवसांपासून मागणी करत आहे. याबाबत निर्मात्याशी चर्चा करत असल्याचा दावा करणी सेनेच्या काही सदस्यांनी केला आहे.

मिळालेल्या अहवालानुसार करणी सेनेच्या सदस्यांनी चित्रपटाच्या (Movie) निर्मात्यांना भेटल्याचा दावा केला असून चित्रपटाचे टायटल बदल्याची मागणी केली आहे. तर संघटनेच्या युवा शाखेने असा दावा केला आहे की, आम्ही निर्मात्यांला भेटलो आणि त्यांनी चित्रपटाचे शीर्षक बदलणार असल्याचे सांगितले. गेल्या आठ महिन्यापासून आम्ही हि मागणी करत आहोत. पण त्याच वेळी निर्माते म्हणाले की 'पृथ्वीराज' (Prithviraj) या चित्रपटाचे टायटाल बदलणार नाहीत. आता करणी सेनेच्या दबावाखाली निर्माते शीर्षक बदलतात का हे पाहावे लागेल.

राजपूत राजे आणि सम्राटांवर बनलेल्या चित्रपटबाबत करणी सेनेने अनेकदा निषेध नोंदवला आहे. करणी सेना यापूर्वी चित्रपट निर्मात्यांवर दबाव आणत आहे आणि त्यानुसार चित्रपटाचे नाव किंवा स्क्रिप्ट बदलण्यास भाग पडत आहे. यावेळेही ते तेच करण्याचा प्रयत्न करत आहेत. हा चित्रपट राजस्थान आणि तिथल्या राजपूत व्यक्तिरेखेवर आधारित असल्यामुळे या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंगची मागणी हि त्यांनी केली आहे. ते म्हणतात कि अनेक मोठ्या व्यक्तीवर चित्रपट बनले आहेत पण चित्रपटाचे नाव त्यांच्या नावर ठेवले गेले नाही.

<div class="paragraphs"><p>Prithviraj चित्रपटाचे शीर्षक बदलणार मेकर्स?</p></div>
इरफान खान यांच्या आठवणींना उजाळा: 14 वर्षांनंतर रिलीज झाला चित्रपट

यशराज फिल्मच्या बॅनरखाली निर्मित हा चित्रपट महान राजा पृथ्वीराज चौहान यांच्यावर आधारित आहे. याचे दिग्दर्शन चंद्र प्रकाश द्विवेदी करत आहेत. या चित्रपटात अक्षय कुमार आणि मानुषी छिल्लरशिवाय संजय दत्त आणि सोनू सूद देखील दिसणार आहेत. या चित्रपटातून मानुषी छिल्लरही बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. चित्रपटाचा टिझर रिलीज झालं असून त्यात अक्षय दमदार अॅक्शन करताना दिसत आहे. हा चित्रपट 21 जानेवारी 2022 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com