मल्लिका शेरावतने बॉलिवूडमध्ये येण्याआधीच केले होते लग्न, मात्र....

दैनिक गोमन्तक
सोमवार, 30 नोव्हेंबर 2020

आज बॉलिवूडची एकेकाळची सुंदरी मल्लिका शेरावतबाबत काही खास गोष्टी आज जाणून घेवूया..  ​

बॉलीवूडच्या चाहत्यांना रोज आपल्या पसंतीच्या स्टार्सबद्दल काहीतरी नवीन ऐकायचे असते. सेलिब्रिटींनाही आपल्या आयुष्याबद्दल रोज काहीतरी नवीन उलगडायचे असते. परंतु, बऱ्याचदा काही गोष्टी अशा असतात ज्यांना हे सेलिब्रिटी उघड करत नाहीत. मात्र, फॅन्सना याबद्दलही जाणून घेण्याची उलट जास्त उत्सुकता असते. अशात आज बॉलिवूडची एकेकाळची सुंदरी मल्लिका शेरावतबाबत काही खास गोष्टी आज जाणून घेवूया..  

मल्लिकाने सन २००३मध्ये ख्वाहिश या सिनेमातून आपल्या बॉलिवू़ड करियरला सुरूवात केली. पहिल्यात चित्रपटात १७ किंसींग सीन देत तीने बॉलिवूडमधील बोल्डनेसच्या नव्या युगाची सुरूवात केली होती. मात्र, मल्लिकाला खरी ओळख मिळाली ती मर्डर या सिनेमामुळे. यात इम्रान हाश्मी बरोबर तिची जोडी सुपरहिट ठरली. हे तिच्या सर्व फॅन्सना माहितीच असेल. मात्र, तिच्यापबद्दल आणखीन काही गोष्टी अशा आहेत ज्या कदाचित अनेकांना माहिती नसतील.  
 
मल्लिकाबद्दल एक विशेष गोष्ट सांगायची म्हणजे तीचं जन्मापासूनचं नाव मल्लिका नसून रीमा लांबा असं हे तीचं मुळ नाव आहे. सिनेमात येण्यासाठी तिने आपलं नाव बदलून मल्लिका केलं. 

याशिवाय मल्लिकाबद्दल आणखीन एक छुपी गोष्ट म्हणजे तिने बॉलिवूडमध्ये पाय ठेवण्याआधीच लग्न केलं होतं. मात्र, नंतर तिने घटस्फोटही घेतला. मल्लिकाने आपलं शिक्षण संपवून एअरहोस्टेस म्हणून काम करायला सुरूवात केली. तिथेच तिची पायलट करण सिंह गिल याच्याशी ओळख झाली.  दोघांमध्ये मैत्रीचे संबंध प्रस्थापित झाले. त्यानंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडून त्यांनी लग्न करून संसार थाटला. मात्र, लग्न झाल्यानंतर एकाच वर्षात दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. त्यानंतर दोघांनी घटस्फोट घेतला. मल्लिकाने मात्र या गोष्टी उघड करण्यास कायमच नकार दिलेला आहे. तिने स्वत:बद्दल कायम आपण सिंगल असल्याचेच म्हटले आहे. 

 बॉलिवूडबरोबरच हॉलिवूडमध्येही काम केलेली मल्लिका आपल्या बोल्डनेसमुळे कायमच चर्चेत राहिली आहे. प्रसिद्ध अभिनेता जॅकी चैन याच्याबरोबरही तिने चित्रपट करून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. या अभिनेत्रीने मर्डर, प्यार के साइड इफेक्ट्स, शादी से पहले, वेलकम, हिस्स, डबल धमाल आणि बिन बुलाए बराती सारख्या सुपरहिट सिनेमांमध्ये काम केले आहे.

  

संबंधित बातम्या