Mamta Mohandas : 'ममता मोहनदास' आपल्या गंभीर आजारावर हे काय बोलली? चाहते झाले भावुक...

अभिनेत्री ममता मोहनदासने तिच्या गंभीर आजारावर केलेली ही पोस्ट सध्या चर्चेतआहे
Mamta Mohandas
Mamta MohandasDainik Gomantak

Actress Mamta Mohandas suffering from cancer अभिनेत्री ममता मोहनदास सध्या एका भयंकर वेदनेचा सामना करत आहे. शारिरीक वेदना तर तीला छळत आहेतच पण त्याचबरोबर ती मानसिक त्रासही सहन करत आहे. आपल्या भावना तिने आता चाहत्यांसोबत शेअर केल्या आहेत.

आपले काही सेल्फी शेअर करताना, ममताने(Mamta Mohandas) चाहत्यांना सांगितले की ती एका मोठ्या ऑटोइम्यून आजाराने ग्रस्त आहे. ममताने तिच्या त्वचारोगाबद्दल या पोस्टमध्ये सांगितले की तिला त्वचारोग आहे. तीला झालेला हा त्वचारोग स्वयंप्रतिकार रोग या प्रकारातला आहे . या आजारात आपला रंग' हरवत चालल्याचंही ममताने तिच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

ममताने शेअर केलेल्या या फोटोत ममता मोहनदास बाहेर बसलेली आहे. तिच्या हातात एक कप आहे, ज्यामध्ये ती कॉफी पीत आहे. तिने काळ्या रंगाचा टी-शर्ट, शॉर्ट आणि जॅकेट घातले आहे.

फोटोंच्या कॅप्शनमध्ये सूर्याला उद्देशुन ममता लिहिते, 'प्रिय सूरज, मी आता तुला कधीच मिठी मारली नाही. बरेच स्पॉट्स, मी माझा रंग गमावत आहे. मी जेव्हा सकाळी उठते. धुक्यातून तुझं पहिलं प्रकाशकिरण निघताना पाहण्यासाठी. तुझ्याकडे जे काही आहे ते मला दे... मी तुझी ऋणी आहे. कायमची.'

ममता मोहनदासने या पोस्टमध्ये रंग, स्वयंप्रतिकार रोग, त्वचारोग आणि सूर्यप्रकाश असे हॅशटॅग देखील वापरले आहेत. ममताच्या पोस्टवर प्रतिक्रिया व्यक्त करताना अभिनेत्री रेबा मोनिका जॉन हिने कमेंट केली की, 'तू एक फायटर आहेस आणि तू सुंदर आहेस.'

एका चाहत्याने कमेंट केली, 'तू खूप पॉवरफुल महिला आहेस. "मी खरंच तुझ्यावर प्रेम करतो आम्हाला प्रेरणा देत राहा". दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले की, "तुम्ही आमच्या सर्वांसाठी लढाऊ आणि प्रेरणा आहात. तुम्ही नक्कीच बरे व्हाल"...

Mamta Mohandas
Biopic Films On OTT: तुम्हाला बायोपिक चित्रपट आवडत असेल तर 'हे' चित्रपटं नक्की पाहा

ममता मोहनदास ही कॅन्सर सर्व्हायव्हर आहे. काही वर्षांपूर्वी कर्करोगाशी तिने यशस्वी झुंज दिली होती.पण हा आजार पुन्हा परतला होता. त्यानंतर त्यांनी अमेरिकेत उपचार घेतले. 2014 मध्ये एका मुलाखतीत बोलताना ममता म्हणाली होती

"मी अशी व्यक्ती होते माणूस होते जीला कशाचीही चिंता नव्हती. कोणतीही समस्या असो ;पण आयुष्यात पहिल्यांदाच मी घाबरले. सकारात्मक राहा, हे सांगणे सोपे आहे. पण आत्ता मला वाटतं की घाबरायला काहीच हरकत नाही.

कॅन्सर हा रोग कला क्षेत्रातल्या अनेकांना संपवुन गेला. कित्येक मोठे कलाकार या आजाराला बळी पडले आहेत. ममताला तिच्या या आजाराशी लढण्यासाठी बळ येवो अशीच इच्छा व्यक्त करत आहेत

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com