Man vs Wild: देसी गर्ल अन् भारताचा माजी कर्णधार दिसणार बेअर ग्रिल्स सोबत

शोमध्ये, बेअर ग्रिल्स प्रेक्षकांना सांगतो की जर कोणी जंगलात, दर्‍यात आणि समुद्रात अडकला तर तो कसा वाचू शकतो.
Man vs. Wild
Man vs. WildDainik Gomantak

बेअर ग्रिल्सचा शो मॅन व्हर्सेस वाइल्ड मधून तुम्ही सर्व परिचित असालच. शोमध्ये, बेअर ग्रिल्स प्रेक्षकांना सांगतो की जर कोणी जंगलात, दर्‍यात आणि समुद्रात अडकला तर तो कसा वाचू शकतो. त्याचा शो प्रेक्षक आवडीने पाहतात आणि इतकंच नाही तर बेअर ग्रिल्स शोमध्ये काहीही खातो आणि आपल्याला कठीन प्रसंगी जगण्यासाठी शिकवत आहे. (Man vs Wild Priyanka Chopra and Virat Kohli will be seen alongside Bear Grylls)

Man vs. Wild
किंग कोहलीचा विमानतळावरच उसळला अनुष्कावर राग, Video Viral

आतापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून, अभिनेते रजनीकांत, अजय देवगण, अक्षय कुमार आणि रणवीर सिंग भारतातून या शोमध्ये सहभागी झाले आहेत, ज्यांनी ग्रिल्सकडून सर्व्हायव्ह करण्यासाठी शिकले आहेत.

लोकप्रिय टीव्ही मालिका ‘मॅन व्हर्सेस वाइल्ड’ (Man vs. Wild) फेम सर्व्हायव्हल एक्सपर्ट बेअर ग्रिल्स भारतामध्ये मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे. आता त्याला भारतीय संघाचा स्फोटक फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहलीसोबत काहा खास करण्याची इच्छा आहे.

ग्रिल्स यावेळी भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) त्याच्या प्रसिद्ध शो ‘मॅन व्हर्सेस वाइल्ड’मध्ये होस्ट करण्यासाठी सज्ज झाला आहे. रविवारी माध्यमांशी बोलताना, त्याने विराट कोहलीसोबत जंगलांना भेट देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. “धाडसी स्वभावाच्या विराट कोहलीसोबत साहस करणे खूप चांगला अनुभव असेल,” असंही यावेळी ग्रिल्स म्हणाला.

Man vs. Wild
Salman Khan Gun License मिळाल्यानंतर भाईजानने खरेदी केली बुलेटप्रूफ कार

भारताचा माजी कर्णधार विराट कोहली जागतिक स्तरावरील प्रसिद्ध खेळाडू आहे तर त्याचे इन्स्टाग्रामवर 20 कोटींपेक्षा जास्त फॉलोअर्स देखील आहेत. त्यामुळे ग्रिल्सला आता विराटसोबत जंगलांमध्ये भटकण्याची इच्छा आहे. मात्र, कोहली बीसीसीआयचा करारबद्ध खेळाडू असल्याने त्याला परवानगी दिली जाईल का? हा आता सर्वात मोठा प्रश्न आहे. बीसीसीआयच्या नियमानुसार दुखापती टाळण्यासाठी तो साहसी खेळांमध्ये भाग घेऊ शकत नाही.

विराट कोहली सध्या खराब फॉर्ममधून जात आहे तर त्याने क्रिकेटमधून ब्रेक घेतला आहे. पत्नी अनुष्का शर्मा आणि मुलीसोबत त्याने लंडन आणि पॅरिसमध्ये सुट्टी घालवण्यास सुरुवात केली. सध्या सुरू असलेल्या वेस्ट इंडिज दौऱ्यातूनही कोहलीला विश्रांती देण्यात आली. या महिन्याच्या अखेरीस आशिया चषकादरम्यान तो पुनरागमन करेल अशी अपेक्षा वर्तवली जात आहे.

प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) आणि विराट कोहली शोमध्ये एकत्र येऊन ग्रिल्स सोबत सर्व्हाइव्ह करताना दिसून येऊ शकतात. समोर आलेल्या बातम्यांनुसार, बेअर ग्रिल्सची इच्छा आहे की त्याने भारतातील एका महिला स्टारसोबत सर्व्हायव्हच्या मिशनवर जावे, ज्यासाठी त्याने अभिनेत्री प्रियांका चोप्राची निवड केली असल्याचे समोर येत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com