मोग म्युझियममध्ये प्रदर्शित होणार अलिगढ

दैनिक गोमन्तक
बुधवार, 23 डिसेंबर 2020

अलिगढ हा वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट २७ डिसेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजता प्रदर्शित करण्यात येणार आहे व त्यानिमित्ताने चित्रपटातील अभिनेता मनोज वाजपेयी व लेखक अपूर्व असरानी रसिकांशी संवाद साधणार आहेत. 

पणजी : पिळर्ण (बार्देस) येथील म्युझियम ऑफ गोवामध्ये अलिगढ हा वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट २७ डिसेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजता प्रदर्शित करण्यात येणार आहे व त्यानिमित्ताने चित्रपटातील अभिनेता मनोज वाजपेयी व लेखक अपूर्व असरानी रसिकांशी संवाद साधणार आहेत. 

हंसल मेहता या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून रसिकांनी या नामवंतांचे विचार,अनुभव ऐकण्याच्या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ७७२२०८९६६६ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

संबंधित बातम्या