ह्रतिक रोशनबरोबर काम करण्यास मनोज वाजपेयीचा नकार?

गोमंन्तक वृत्तसेवा
शनिवार, 5 जून 2021

हृतिक रोशन स्टार वेब सीरिज द नाईट मॅनेजरचा हिंदी रिमेक असणार आहे. त्यासाठी मनोज बाजपेयी यांच्याशीही चर्चा सुरू होती.

मुंबई: मनोज वाजपेयी (Manoj Bajpai) यांचा 'द फैमिली मैन 2 (The Family Man 2)' सध्या प्रकाशझोतात आहे. वेब मालिका चाहत्यांनी या सिरीजला अक्षरश:  डोक्यावर उचलून घरले आहे. पूर्वी अभिनेता मनोज वाजपेयी यांची ही वेब मालिका बर्‍याच वादात होती. सोशल मीडियावर या सिरीजचे प्रकाशन थांबविण्याची मागणीही करण्यात आली होती. मात्र आता रिलीजनंतर या वेब सिरीजसाठी मनोज बाजपेयी यांचे सर्व बाजूंकडून कौतुक होत आहे. अभिनेत्याकडे येत्या काही दिवसांत बरेच नवे प्रोजेक्ट आहेत. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेता हृतिक रोशनच्या (Hrithik Roshan) डेब्यू वेब सीरिजमध्ये दिसणार आहे, पण आता मनोज बाजपेयी यांनी या वेब सीरिजमधून माघार घेतली आहे. 

टॉम हिडलस्टनच्या 'द नाईट मॅनेजर' '(The Night Manager)'साठी मनोज वाजपेयी ला शस्त्र विक्रेता रिचर्ड रोपरची (Richard Roper) भूमिका साकारण्यासाठी निर्मात्यांनी मनोज बाजपेयीशी संपर्क साधला. द नाईट मॅनेजरमध्ये ही भूमिका ह्यू लॉरीने साकारली होती. त्याच वेळी, टॉम हिडलस्टनने द नाईट मॅनेजरमध्ये 'जोनाथन पाइन' ही भूमिका साकारली. हा हृतिक रोशन स्टार वेब सीरिज द नाईट मॅनेजरचा हिंदी रिमेक असणार आहे. त्यासाठी मनोज बाजपेयी यांच्याशीही चर्चा सुरू होती.

The Family Man-2 Trailer : ब्यूटी गर्ल पहिल्यांदाच दिसणार विलनच्या भूमिकेत

पण दुर्दैवाने मनोज बाजपेयी यांनी हे पात्र साकारण्यास नकार दिला आहे. मिड माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार मनोज बाजपेयी यांच्या केडे डेट्स नसल्याने 'त्यांनी या मालिकेत कामकरण्यास नकार दिला. असे कारण आता सांगण्यात येत आहे. म्हणून याच कारणामुळे मनोज वाजपेयी हृतिक रोशनच्या डेब्यू वेब सीरिजमध्ये दिसणार नाही.

मनोज बाजपेयी यांच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार “मनोज सर मालिकेत चर्चेत होते, पण कोरोना व्हायरस च्या दुसर्‍या लाटेमुळे त्याच्या प्रोजेक्टला आधीच खूप उशीर झाला आहे. ते सध्या उत्तराखंडमध्ये एका चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यानंतर ते त्याच्या पेंडींग प्रोजेक्टचे शूटिंग सुरू करणार आहेत. अशा परिस्थितीत मालिकेच्या निर्मात्यांनुसार तारखा नसल्याची जाणीव त्याला झाली. यामुळे त्यांनी या प्रोजेक्टला नकार दिला आहे."मण मिळालेल्या माहितीनुसार ही सिरीज वर्षाच्या अखेरीस डिस्ने प्लस हॉटस्टारवर रिलीज होऊ शकते.

संबंधित बातम्या