व्यक्तिरेखा वास्तवात जगण्याचा प्रयत्न करतो: मनोज वाजपेयी

इंडियाज ओन जेम्स बॉण्ड’ स्वतःचे जेम्स बाँड विथ द फॅमिली मॅन’ या विषयावरील संवाद सत्रात’ प्रसिद्ध अभिनेते मनोज बाजपेयी (Manoj Bajpayee) यांनी आपल्या मनोगतात हे सांगितले.
व्यक्तिरेखा वास्तवात जगण्याचा प्रयत्न करतो: मनोज वाजपेयी
Manoj Bajpayee and Samantha Ruth PrabhuDainik Gomantak

पणजी: मी कधीच व्यक्तिरेखा ‘लार्जर दॅन लाइफ’ करण्याचा प्रयत्न करीत नाही. मी नेहमीच वास्तवात जगण्याचा आणि व्यक्तिरेखा जनतेतली प्रतिनिधी वाटेल, अशाप्रकारे साकारण्याचा प्रयत्न करतो. गोव्यात 52 व्या IFFI दरम्यान आयोजित ‘क्रिएटिंग कल्ट आयकॉन्स: इंडियाज ओन जेम्स बॉण्ड’ स्वतःचे जेम्स बाँड विथ द फॅमिली मॅन’ या विषयावरील संवाद सत्रात’ प्रसिद्ध अभिनेते मनोज बाजपेयी (Manoj Bajpayee) यांनी आपल्या मनोगतात हे सांगितले.

मध्यमवर्गीय भारतीयाच्या जीवनात विनोद पुरेपूर भरलेला आहे आणि तो आपल्या सर्व पात्रांमागचा संदर्भ आणि प्रेरणा असल्याचे मनोज यांनी सांगितले. ''द फॅमिली मॅन'' ही मध्यमवर्गीय भारतीय माणसाची एक उत्तम कथा आहे. नोकरीत कामाच्या ओझ्याने दबलेला आणि प्रचंड अपेक्षा बाळगणारे त्याचे कुटुंब अशी पार्श्ववभूमी असलेला हा माणूस आपल्या जीवनात संतुलन साधण्याचा प्रयत्न करत असतो. ‘द फॅमिली मॅन’ चे दिग्दर्शक राज निदिमोरू व कृष्णा डीके, जे राज आणि डीके नावाने प्रसिद्ध आहेत, त्यांनीही या सत्राला संबोधित केले. संपूर्ण भारताला आपलीशी वाटेल अशी कथा साकारण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

Manoj Bajpayee and Samantha Ruth Prabhu
प्रियंका चोप्रा-निक जोनासच्या विभक्त होण्याच्या वृत्तावर आई मधु चोप्राने तोडले मौन

समंथाची मेहनत

समंथा रूथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) ही तेलुगू आणि तमिळ चित्रपट सृष्टीतली नामवंत अभिनेत्री आहे. या वेबमालिकेविषयीच्या संवाद सत्रात बोलताना समंथा म्हणाली, या वेबमालिकेतली तिची ‘राजी’ची भूमिका आव्हानात्मक होती. भूमिकेची तयारी करण्यासाठी आपण अनेकांची मदत घेतली तसेच खास प्रशिक्षणही घेतले. ओटीटी मंचाविषयी विचारण्यात आलेल्या ओटीटी या व्यासपीठाला सशक्त कथानकाची गरज असते. आणि त्याचबरोबर पात्रांना सहानुभूतीची मागणी करणारा मंच आहे. या संवाद सत्राचे सूत्रसंचालन अभिनेता अंकूर पाठक याने केले. माहिती आणि प्रसारण मंत्रालय सचिव अपूर्व चंद्रांच्या हस्ते संवादामध्ये मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com