Vicky Kaushal अन् कतरिनाला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपींना अटक

Vicky Katrina Death Threat: मनविंदर सिंग असे एकाचे नाव असून तो लखनऊचा रहिवासी आहे.
 Vicky Kaushal & Katrina Kaif
Vicky Kaushal & Katrina KaifDainik Gomantak

Vicky Katrina Death Threat: बॉलिवूड अभिनेता विक्की कौशल आणि कतरिना कैफ यांना धमकी दिल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. मनविंदर सिंग असे एकाचे नाव असून तो लखनऊचा रहिवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनविंदर सिंग हा कतरिनाचा मोठा चाहता आहे. आरोपीचे इन्स्टाग्राम हँडलही आहे. जिथे त्याने आपल्या बायोमध्ये कतरिनाला 'गर्लफ्रेंड' म्हटले आहे.

विशेष म्हणजे, या प्रकरणी विक्कीने मुंबईतील (Mumbai) सांताक्रूझ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली, त्यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करुन या प्रकरणाचा तपास सुरु केला. आदित्य राजपूत नावाच्या व्यक्तीवर सोशल मीडियावरुन धमक्या दिल्याचा आरोप होता. विक्की कौशलच्या तक्रारीवरुन पोलीस आदित्यचा तपास करत आहेत.

 Vicky Kaushal & Katrina Kaif
Katrina Kaif Brother: बॉलिवूडची 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री करतेय कतरिना कैफच्या भावाला डेट

दरम्यान, विक्की कौशलच्या तक्रारीवरुन पोलिसांनी कलम 506(2), 354(डी) आयपीसी कलम 67 आयटी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. इन्स्टाग्रामवरुन एका मेसेजद्वारे अज्ञात व्यक्ती आपल्याला धमकावत असल्याचा विक्कीने केला होता. तसेच आरोपी (Accused) आपल्या पत्नीवर म्हणजेच कतरिना कैफवर नजर ठेवून तिला धमकावत असल्याचा आरोपही त्याने केला होता.

 Vicky Kaushal & Katrina Kaif
Birthday Special: कतरिना कैफच्या डान्स आणि अदांवर टाकूया एक नजर

दुसरीकडे, विक्की कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफचे (Katrina Kaif) गेल्या वर्षी 9 डिसेंबरला लग्न झाले होते. अलीकडेच, दोन्ही स्टार्स त्यांच्या निकटवर्तीय मित्रांसोबत कतरिनाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मालदीवमध्ये होते. 16 जुलै रोजी कतरिनाने तिचा 39 वा वाढदिवस साजरा केला. तिथून दोन्ही स्टार्सचे अनेक खास फोटोही समोर आले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com