Chris Hemsworth Taking Break: मार्व्हलच्या 'या' सुरपहीरोला आहे गंभीर आजार; कामातून ब्रेक घेण्याचा निर्णय

सध्या हातातील प्रोजेक्ट वेगाने पुर्ण करण्यावर भर
Chris Hemsworth Taking Break
Chris Hemsworth Taking BreakDainik Gomantak

Chris Hemsworth Taking Break: मार्व्हल स्टुडियोजच्या अॅव्हेंजर्स या चित्रपट फ्रँचायजीसह इतर मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्समध्ये थॉर हा सुपरहीरो साकारणारा अभिनेता ख्रिस हेम्सवर्थ आता अभिनयातून ब्रेक घेणार आहे. ख्रिसने काही काळ कामापासून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे.

Chris Hemsworth Taking Break
IFFI Goa 2022: 53 व्या इफ्फीचे थाटात उद्घाटन; सौरांना जीवनगौरव तर चिरंजीवी 'Personality of The Year'

18 नोव्हेंबर रोजी ख्रिस हेम्सवर्थने स्वतःच याबाबत खुलासा केला आहे. ख्रिसला अल्झायमरची लक्षणे दिसून आली आहेत. अल्झायमर हा अनुवंशिक आजार आहे. अल्झायमरमध्ये व्यक्तीची स्मृती जाते. एरवी हा आजार ज्येष्ठांना होत असतो. पण ख्रिसमध्ये आत्तापासूनच या आजाराची लक्षणे दिसून आली आहेत. त्यामुळे ख्रिसला धक्का बसला आहे. त्याने आता आरोग्यावर अधिक लक्ष देण्याचे ठरवले आहे. आणि म्हणूनच त्याने कामातून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे.

ओटीटी शो 'लिमिटलेस विद क्रिस हेम्सवर्थ'मध्ये त्याने सांगितले की, मला काळजी हीच आहे की मला फिरवून फिरवून एखादी गोष्ट सांगता येत नाही. मला या अडचणीला जास्त महत्व द्यायचे नाही. मी काम पुर्णतः बंद करणार नाही. पण मला आता वाटते की काही काळ ब्रेक घ्यायला हवा. सध्या मी हातातले प्रोजेक्ट पुर्ण करण्यावर भर देत आहे. प्रलंबित कामे पुर्ण केल्यावर मी शांततेत घरी जाऊ शकेन. घरी वेळ घालवेन. बायको-मुलांना वेळ देईन. माझ्या वडीलांना अल्झायमर होता.

Chris Hemsworth Taking Break
IFFI 21 Nov Schedule: दृश्यम-2, RRR, इंडिया लॉकडाऊनसह सोमवारी इफ्फीत विविध चित्रपटांची मेजवानी

डिस्नी स्टुडियोने मुलाखतीतील आजारपणाचा भाग दाखवायचा की नाही, असे ख्रिसला विचारले होते. त्यावर ख्रिस म्हणाला होता की, लोकांना यातून प्रेरणा मिळणार असेल तर मला त्यात काही वावगे वाटणार नाही. लोक स्वतःची जास्त काळजी घेतील, आजारपणाशी लढतील, हाच योग्य मार्ग आहे.

दरम्यान, ख्रिसच्या कामाबाबत बोलायचे तर तो 'एक्सट्रॅक्शन 2' मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रीलीज होईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com