Goa Beach वर येत्या 27 ला मौनी रॉय बॉयफ्रेंड सूरजसोबत घेणार सात फेरे

लग्नाच्या विधी सुरु होण्यापूर्वीच मौनी रॉय गोव्याला (Goa) रवाना झाली आहे.
Goa Beach वर येत्या 27 ला मौनी रॉय बॉयफ्रेंड सूरजसोबत घेणार सात फेरे
Mouni RoyDainik Gomantak

टीव्ही क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) 27 जानेवारीला बॉयफ्रेंड सुरज नांबियासोबत लग्न करणार आहे. हे लग्न गोव्यात पार पडणार आहे. लग्नामध्ये फक्त जवळचे नातेवाईक आणि मित्रपरिवार उपस्थित राहणार आहे. लवकरच मौनी रॉयच्या लग्नाची (Wedding) तयारी जोरात सुरु असून लग्नाच्या विधी सुरु होणार आहेत. लग्नाच्या विधी सुरु होण्यापूर्वीच मौनी रॉय गोव्याला (Goa) रवाना झाली आहे.

अलीकडेच मौनी मुंबई विमानतळावर (Mumbai) गोव्यासाठी (Goa) रवाना होताना दिसली. तिने तपकिरी रंगाचा ड्रेस परीक्षण केला असून काळा सनग्लास घातला होता. तसेच चेहऱ्यावर मास्क लावले होते. मौनी रॉयच्या लग्नाची चर्चा खूप दिवसांपासून सोशल मीडियावर सुरु आहे.

Mouni Roy
मलायका आणि अरबाज खान यांना एकाच दिवशी दोनदा लग्न का करावे लागले?

मौनी रॉय आणि सुरज नांबियार यांची पहिली भेट दुबईमध्ये झाली होती. ते नवीन वर्षाच्या पार्टीमध्ये दुबईला आले होते. तिथूनच त्यांची लव्हस्टोरी सुरु झाली. मौनी रॉय रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) 'ब्रह्मास्त्र' चित्रपटामध्ये महत्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.