मे महिना ठरणार चित्रपट प्रेमींसाठी मेजवानी

दैनिक गोमंतक
बुधवार, 5 मे 2021

कोरोना साथीच्या आजारामूळे सर्व जण थिएटरमध्ये पोहोचण्यास कचरतात.

कोरोना साथीच्या (Coronavirus) आजारामूळे सर्व जण थिएटरमध्ये पोहोचण्यास कचरतात. किंबहुना काही ठिकाणी ते बंद आहेत. तुम्ही जर चित्रपट प्रेमी असाल तर हा महिना तुमच्यासाठी मेजवानी असेल. कारण या महिन्यात नेटफ्लिक्स (Netflix), अॅमेझॉन प्राइम (Amazon Prime) आणि डिस्ने प्लस हॉटस्टार (Hotstar) सारख्या अनेक ओटीटी प्लॅटफॉर्म त्यांच्या दर्शकांसाठी उत्कृष्ट चित्रपट, शो आणि मालिका घेऊन येत आहेत. चला तर मग जाणून घेऊया कोणता चित्रपट आणि मालिका प्रेकक्षकांच्या भेटीला येत आहेत. (May will be a feast for movie lovers) 

लावा का धावा (Lava Ka Dhaava)

Image

लावा का धावा हा फ्लोर इस लावाचे हिंदी रूपांतर आहे. हा शो 5 मेपासून नेटफ्लिक्सवर प्रसारित होणार आहे. या खेळाची खास बाब म्हणजे ताकीशिगे कसाल नंतर जावेद जाफरी पुन्हा एकदा आपल्या मजेदार भाष्यातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहेत. अनेक स्पर्धक शोमधील कठीण कामे पूर्ण करताना दिसतील.

रिलीज तारीख- 5 मे 
प्लॅटफॉर्म- नेटफ्लिक्स

 रामयुग (Ramyug)

Image
प्लॅटफॉर्म - एमक्स प्लेअर
रिलीज तारीख - 6 मे
कलाकार- दिगंधा मंचले, अक्षय डोगरा, ऐश्वर्या ओझा, दुहानसिंग, जीवन भटेना, नवदीप पन्नापोले, अनिष झोन
कुणाल कोहली दिग्दर्शित ‘रामयुग’ ही मालिका 6 मे रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. मालिकेत रामायणची कथा दाखविली जाणार आहे.

 माइलस्टोन (Milestone)

Milestone | Official Trailer | Ivan Ayr, Suvinder Vicky, Lakshvir Saran |  Netflix India - YouTube

प्लॅटफॉर्म - नेटफ्लिक्स
रिलीज तारीख - 7 मे
कास्ट- लक्षविर सरन, सुविंदर विक्की

माईलस्टोन हा चित्रपट  ट्रक चालकाच्या कथेवर आधारित 7 मे रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. एका छोट्या मुलामुळे एकाकीपणा असताना ड्रायव्हरची नोकरी कशी धोक्यात येते हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन इवान अय्यर यांनी केले असून यापूर्वी त्याने सोनी फिल्मचे दिग्दर्शन केले होते. हा चित्रपट नेटफ्लिक्सवरही प्रदर्शित होईल.

हम भी अकेले तुम भी अकेले (Akele Hum Akele Tum)

Hum Bhi Akele, Tum Bhi Akele: Official Trailer I Anshuman Jha, Zareen Khan  I Harish Vyas I May 9th - YouTube
प्लॅटफॉर्म - डिस्ने प्लस हॉटस्टार
प्रकाशन तारीख - 9 मे
कलाकार- झरीन खान, अंशुमन झा

बॉलिवूड अभिनेत्री झरीन खान आणि अंशुमन झा अभिनीत फिल्म हम भी अकेले, तुम भी अकेले रोड ट्रिपवर आधारित चित्रपट आहे. झरीन चित्रपटात लेस्बियनची भूमिका साकारत आहे तर अंशुमन देखील समलैंगिक भूमिकेत आहे. फर्स्ट रेच्या निर्मितीत तयार झालेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन हरीश व्यास यांनी केले आहे.

राधे- योर मोस्ट वॉन्टेड भाई (Radhe- Your Most Wanted Bhai)

Image
प्लॅटफॉर्म - झी प्लेक्स
रिलीज तारीख - 13 मे

कलाकार- सलमान खान, दिशा पाटनी, रणदीप हूडा

अनेक महिने पुढे ढकलल्यानंतर सलमान खानची राधे अखेर प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यास सज्ज झाली आहे. ईदच्या निमित्ताने हा चित्रपट 13 मे रोजी चित्रपटगृहांमध्ये तसेच झी फ्लेक्सवरती प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचा ब्लॉकबस्टर ट्रेलर आणि गाणीही रिलीज झाली आहेत, जी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत.

अल्मा मैटरः इनसाइड द आईआईटी ड्रीम​​​​​​​​​​​​​​

प्लॅटफॉर्म - नेटफ्लिक्स
रिलीज तारीख - 14 मे
कलाकार - बिस्वा कल्याण रथ

हा एक माहितीपट असणार आहे ज्यात आयआयटी खरगपूर कॅम्पसची इनसाइड स्टोरी दर्शविली जाणार आहे. आयआयटीसाठी हे कॅम्पस देशातील सर्वोत्कृष्ट संस्था आहे जिथे बिस्वा विद्यार्थिनीची कथा सांगेल.

संबंधित बातम्या