Milind Soman चा मुंबईच्या समुद्र किनारी नवा आशियाना!

मिलिंद सोमण वयाच्या 56 व्या वर्षीही तरुणांना मागे टाकतांना दिसत आहे. कधी तो मॅरेथॉनमध्ये धावताना तर कधी जिममध्ये घाम गाळताना दिसतो.
Milind Soman
Milind SomanDainik Gomantak

Milind Soman House: मिलिंद सोमण वयाच्या 56 व्या वर्षीही तरुणांना मागे टाकतांना दिसत आहे. कधी तो मॅरेथॉनमध्ये धावताना तर कधी जिममध्ये घाम गाळताना दिसतो. आपल्या आरोग्याची आणि फिटनेसची विशेष काळजी मिलिंद सोमन घेत असतो. मिलिंद सोशल मीडियावर चाहत्यांना त्याच्या फिटनेस आणि लव्ह लाईफबद्दल जागरूक करत असतो.

मिलिंद सोमण अलीकडेच लडाखमध्ये पत्नी अंकिता कोंवरसोबत आनंदाचे क्षण घालवताना दिसला. मिलिंद केवळ फिटनेसची काळजी घेत नाही तर त्याच्या संपत्तीचीही काळजी घेतो. म्हणूनच या अभिनेत्याने मुंबईत 4 बेडरूमचा आलिशान अपार्टमेंट घेतला आहे. मिलिंद सोमणने मुंबईतील प्रभादेवी परिसरात 4 बेडरूमचे अपार्टमेंट बुक केले आहे. दादर बीचजवळ बांधलेले, सुमारे 1720 स्क्वेअर फूट कार्पेट एरिया आणि दोन पार्किंग असलेले हे आलिशान अपार्टमेंट सूरज इस्टेट डेव्हलपर्स लिमिटेडने बांधले आहे.

Milind Soman
Milind Soman Pics: अभिनेता मिलिंद सोमणने घेतली पंतप्रधान मोदींची भेट, सोशल मीडियावर बोलबाला

मिलिंदचे अपार्टमेंट प्रभादेवी परिसरात आहे. मिलिंद सोमणचे नवीन घर केवळ आलिशानच नाही तर लोकेशननुसार खूप खास आहे. दादर बीच इथून फार दूर नाही, जैन मंदिर आणि प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरही फार जवळ आहे. याशिवाय दादर स्टेशन फक्त 10 मिनिटांच्या अंतरावर आहे. सूरज इस्टेट डेव्हलपर्स लिमिटेडचे ​​संचालक राहुल थॉमस यांनी मिंटशी बोलताना सांगितले की, प्रभादेवी परिसरात बांधलेले हे अपार्टमेंट समुद्रापासून 100 मीटरपेक्षा कमी अंतरावर आहे. आमच्या अपार्टमेंटमध्ये मिलिंद सोमणचे स्वागत करण्यासाठी आम्ही अत्यंत उत्सुक आहोत.

Milind Soman
Money Laundering Case: जॅकलिनच्या चौकशीला सुरूवात, EOWची प्रश्नांची यादी तयार

मिलिंद कंगनासोबत 'इमर्जन्सी' चित्रपटामध्ये दिसणार आहे. कंगना राणौतच्या आगामी 'इमर्जन्सी' चित्रपटात मिलिंदची दमदार एंट्री बघायला मिळणार आहे. या चित्रपटात अभिनेता सॅम माणेकशॉच्या भूमिकेत दिसणार आहे. आणीबाणीच्या कथेवर आधारित या चित्रपटात, जिथे कंगना माजी पंतप्रधान इंदिरा गांधींची भूमिका साकारत आहे, तिथे मिलिंद सॅम माणेकशॉच्या भूमिकेत दिसणार आहे. अलीकडेच या चित्रपटातील कलाकारांचा लूक समोर आला आहे, ज्यामुळे मिलिंद पुन्हा एकदा पडद्यावर एक दमदार व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com