पैसे गेले पण घरपोच दारु मिळालीच नाही; शबाना आझमींची ऑनलाईन फसवणूक

shabana.jpg
shabana.jpg

बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री शबाना आझमीने आज (Shabana Azmi) ट्विटर (Twitter) वर तिची फसवणू केल्याचे सांगितले आहे. दारूच्या डिलिव्हरी ऑनलाइन प्लॅटफॉर्मने (Delivery online platform) तिची फसवणूक केली आहे असा दावा पोस्टमध्ये शबाना आझमी यांनी  केला आहे. की दारू वितरण मंचने तिच्याकडून पैसे घेतले आहेत, तसेच ऑर्डर देखील घेतली पण दारूची डिलिव्हरी नाही आली. (The money was gone but the alcohol was not delivered at home Shabana Azmi online fraud) 

शबाना आझमी यांनी ट्वीट करून लिहिले की, 'सावधगिरी बाळगा' त्यांनी मला फसवले आहे. मी पैसे दिले आहेत. मी ऑर्डरदेखील दिली आहे. परंतु अद्याप ती वस्तू मिळालेली नाही. तसेच त्यांनी माझे कॉल घेणे बंद केले आहे. शबाना आझमी यांनीही ट्विटसह व्यवहाराचा तपशील दिला आहे. किती पैशाची फसवणूक केली आहे हे आझमीने सांगितले नाही.तसेच तिने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे की नाही याची माहिती दिली नाही.

याआधी अक्षय खन्ना (Akshaye Khanna), नरगिस फाखरी (Nargis Fakhri) आणि करणसिंग ग्रोव्हर (Karan Singh Grover) यांच्यासह बॉलिवूडमधील अनेक कलाकारही (celebrities) ऑनलाइन फसवणूकीचे (online fraud) बळी ठरले आहेत.शबाना आझमी लवकरच दिव्या दत्ताच्या चित्रपट शीर खुर्मामध्ये (Sheer Qorma) दिसणार आहे. शबाना आझमी एक चित्रपट अभिनेत्री आहे. त्यांनी बर्‍याच चित्रपटांमध्ये काम केले आहे.शबाना आझमी यांनी बॉलिवूडमधील बर्‍याच कलाकारांसोबत काम केले आहे. शबाना आझमी अनेकदा त्यांच्या चाहत्यांशी संवाद साधतात .त्यामुळे त्यांचे चाहतेही खूप उत्साही असतात.शबाना त्यांच्या वक्तव्यांमुळे सोशल मीडियावरही ट्रेंड होत असतात. याशिवाय त्या बर्‍याच वेळा ट्रोलिंगच्याही  बळी ठरल्या आहेत. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com