...पण इथे आम्ही चित्रकारितले हीरो-हीरोईन आहोत!

येथे सादर केलेल्या कलाकृतीसाठी कला महाविद्यालयाच्या सुमारे 70 हून जास्त विद्यार्थ्यांनी काम केले आहे.
...पण इथे आम्ही चित्रकारितले हीरो-हीरोईन आहोत!
IFFI 52Dainik Gomantak

इफ्फीच्या (IFFI 52) प्रांगणात गोवा कला महाविद्यालयाच्या (College) अप्लाईड आणि पेंन्टींग विभागातल्या विद्यार्थ्यांच्या कलाकृतीचे सध्या भरभरून कौतुक होताना दिसते आहे. चित्रकारितेतून तयार केलेले मिनी सिनेमानगरीचे हे दालन कलाकुसरीचा सुबक नजराणा आहे अशी प्रतिक्रिया दालनाला भेट देणाऱ्या दर्शकांकडून होत असते.

इफ्फीच्या रस्त्याशेजारील फुटपाथावर कला महाविद्यालयाची 5 दालने थाटण्यात आली आहेत. येथे सादर केलेल्या कलाकृतीसाठी कला महाविद्यालयाच्या सुमारे 70 हून जास्त विद्यार्थ्यांनी काम केले आहे.

IFFI 52
गोड साखरनिर्मितीमागे दडलेल्या ‘तिखट’ वेदनांची कथा

‘दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’ (Dilwale Dulhania Le Jayenge) सिनेमांतील सूर्यफुलाच्या शेतात उभे राहिलेली काजोल (Kajol) आणि शाहरूख खान (Shah Rukh Khan), 2-डी आर्ट, रेंगो सिनेमातला क्षण, इल्युजन आर्ट, हॅरी पॉटरची व्यक्तिरेखा, ग्राफिटी आर्ट या साऱ्या कलाकृती लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

‘आम्हा विद्यार्थ्याना असाईन्मेंन्ट म्हणून हे काम दिले जाते. त्यांचे गुणही आम्हाला मिळतात. यंदा ऑक्टोबर महिन्यात आम्हांला संबंधित असाईन्मेंन्टविषयी सांगण्यात आले. फक्त आठ दिवसांच्या कालावधीत सर्व कलाकृती तयार करण्यात आल्या आहेत. मात्र या आठ दिवसांत दिवसरात्र काम करून आम्ही या कलाकृती तयार केल्या आहेत. आम्ही साऱ्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात राहूनच हे काम केले आहे. आमच्यात उत्साह होता. त्यामुळे तासनतास यावर आम्ही काम करू शकलो. सकाळी 4 ते 8 यावेळेत फक्त आम्ही झोपायचो.

मात्र कलाकृती तयार झाल्यावर व लोकांनी त्यांचे कौतुक केल्यावर समाधान मिळाले’ ही प्रतिक्रिया होती, अप्लाइड आर्टसच्या चौथ्या वर्षातील विद्यार्थी प्रथम नाईक यांची. प्रा.सागर गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या कलाकृती तयार केल्या आहेत असे त्याने यावेळी सांगितले. संध्याकाळी रोषणाईच्या मदतीने येथील कलाकृती अजून मनमोहक वाटतात. लोकांकडून मिळालेली शाबासकीची थाप आमच्यासाठी खूप मौल्यवान आहे असे मत विद्यार्थ्यानी व्यक्त केले.

‘कोणी येथे येऊन सेल्फी काढतात...तर कोणी फॅमिली फोटो, कोणी येऊन आमच्या चित्रकलेविषयी चौकशी करतो, तर कोणी आम्हां चित्रकारांसोबत फोटो काढण्याची इच्छा व्यक्त करतो. तुम्ही विचारता ना आम्हांला कसे वाटते?...तर आम्ही सांगू इच्छितो, सिनेमानगरीतले नसू.. पण इथे आम्ही चित्रकारितले हीरो-हीरोईन आहोत.’ त्यांची चित्रे पाहताना लोकांच्या चेहऱ्यावरचे कौतुक पाहताना त्यांच्या त्या भावना खऱ्या आहेत याची साक्ष पटत होती.

- रश्मी नर्से जोसलकर

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com