Mother's day 2021: आई झाल्या अन "त्यांचा" रुपेरी पडद्यावरचा प्रवास थांबला...

गोमंन्तक वृत्तसेवा
रविवार, 9 मे 2021

स्त्री सामान्य असो किंवा सुपरस्टार कोणत्याही स्त्रीसाठी तिची मुले सर्वात महत्वाची आणि प्रथम प्राधान्यदायी असते. चित्रपटसृष्टीतही पाहिले गेले तर. बॉलिवूडमध्ये बर्‍याच वेळा असे दिसून आले आहे की बर्‍याच सुपरस्टार अभिनेत्रींनी मुलांचे संगोपन करण्यासाठी अभिनयाला निरोप दिला आहे.

generalMother's Day आई होणे हे जगातलं सर्वात सुंदर सुख समजलं जात. ही एक वेगळीच भावना असते. जेव्हा एखादी स्त्री आई बनते, तेव्हा तिचे आयुष्य पूर्ण झाल्यासारखे तीला वाटते. प्रत्येक स्त्रीसाठी(Women) हा एक खास आणि अभिमानाचा क्षण असतो. आणि आई तर आई असते, मग ती एक सामान्य स्त्री असो किंवा सुपरस्टार. कोणत्याही स्त्रीसाठी तिची मुले सर्वात महत्वाची आणि प्रथम प्राधान्यदायी असते. चित्रपटसृष्टीतही(film Industry) पाहिले गेले तर. बॉलिवूडमध्ये(Bollywood) बर्‍याच वेळा असे दिसून आले आहे की बर्‍याच सुपरस्टार अभिनेत्रींनी(Actresses) मुलांचे संगोपन करण्यासाठी अभिनयाला निरोप दिला आहे.(Mothers day 2021 After becoming a mother many actresses stopped their Bollywood journey)

शर्मिला टागोर(Sharmila Tagore)

60 ते 70 च्या दशकात आणि त्याही पलीकडे बॉलीवूडची सर्वोच्च स्टार म्हणून काम करणाऱ्या शर्मिला टागोर यांनी लग्नानंतर आणि मुलं झाल्यानंतर अभिनय करणे बंद केले. त्यांनी स्वत: एका मुलाखतीत सांगितले होते की, शूटिंगच्या बिझी शेड्युलमुळे त्या मुलांना वेळ देऊ शकत नाही. आणि त्यांना या गोष्टीचे फार वाईट वाटायचे. नंतर त्यांनी मुलांचे संगोपन करण्यास प्रथम प्राधान्य दिले.

गोमंतकीय कलाकारांना ‘सूर नवा ध्यास नवा’ कार्यक्रमात संधी 

बबिता(Babita)

1966 मध्ये आलेल्या 'दस लाख' या चित्रपटातून चित्रपट सृष्टीत पदार्पण करणाऱ्या बबीता यांनी 6 नोव्हेंबर 1971 रोजी रणधीर कपूर यांच्याशी विवाह केला. नंतर त्यांनी निर्णय घेतला की त्या यानंतर चित्रपटांमध्ये काम करणार नाही. जेव्हा त्यांना करिश्मा आणि करीना या दोन मुली झाल्या तेव्हा त्यांनी अभिनय करणेच सोडून दिेले. बबीता यांनी आपल्या मुलींची आणि घराची देखभाल करण्यात वेळ दिला आणि चित्रपटांना कायमचा निरोप ठोकला.

ट्विंकल खन्ना(Twinkle Khanna) 

सुपरस्टार राजेश खन्ना यांची मुलगी आणि अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्ना. ट्विंकल खन्नाने अनेक सुपरस्टार्सबरोबर काम केले. तिच्या कारकीर्दीत ती अनेक हिट चित्रपटांचा एक भाग राहिली आहे. पण अक्षयशी लग्न केल्यानंतर मुलांचे संगोपन करण्यासाठी ती चित्रपटांपासून दूर गेली. आता ट्विंकल आणि अक्षय यांना दोन मुले आहेत.

Mothers Day 2021: दारात ऊभी राहून निरोप देणारी आई आठवली 

करिश्मा कपूर(Karisma Kapoor)

बॉलिवूडची टॉप अभिनेत्री असलेल्या करिश्मा कपूरने 2003 मध्ये दिल्लीस्थित बिझनेसमन संजय कपूरशी लग्न केले. लग्नानंतर ती अचानक चित्रपटांमधून गायब झाली. नंतर तिचा संजय कपूरशी घटस्फोट झाला. तीला दोन मुले आहेत आणि ती त्यांच्याबरोबर सुखी जीवन जगत आहेत. मुलं मोठी झाल्यानंतर तीने बर्‍याच दिवसांनी अभिनय करण्यास प्राधान्य दिले.

नीतू सिंग(Neetu Singh)

70 आणि 80 च्या दशकात सर्वात सुंदर आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नीतू सिंगने बॉलिवूडमधील बर्‍याच चित्रपटांमध्ये काम केले आहे. 'कस्मे वादे', 'काला पत्थर', 'द ग्रेट गॅम्बलर', 'अमर अकबर अँथनी', 'रफू चक्कर' आणि 'कभी कभी' या चित्रपटांमधून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. पण मुले झाल्यावर त्यांनीही बॉलिवूडपासून स्वत:ला दूर केले. नीतू कपूर यांना रणबीर कपूर आणि रिद्धिमा कपूर ही दोन मुलं आहेत.

सोनाली बेंद्रे(Sonali Bendre)

सोनाली बेंद्रेनेही स्वत: ला मुलांच्या संगोपनासाठी चित्रपटांपासून दूर केले होते. बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रेने आपल्या अभिनयाने कोट्यवधी लोकांची मने जिंकली आहे. तिच्या निरागस चेहऱ्याचे आजही लोकं दिवाणे आहेत. 12 नोव्हेंबर 2002 रोजी तिने चित्रपट दिग्दर्शक गोल्डी बहल सोबत लग्न केले. त्या दोघांनाही एक मुलगा आहे.

लारा दत्ता (Lara Datta)

सन 2000 मध्ये लारा दत्ता मिस इंडिया स्पर्धा जिंकली आणि त्याच वर्षी तीची मिस युनिव्हर्स म्हणूनही निवड झाली होती. लारा दत्ताची गणना त्या बॉलिवूड अभिनेत्रींमध्ये केली जाते ज्यांनी आपल्या करिअरची सुरुवात मोठ्या कलाकारांसोबत केली आहे, मात्र हळूहळू ती बॉलिवूडमधून गायब झाली. 2011 मध्ये महेश भूपतीशी लग्नानंतर तिचे आयुष्यच बदलले. 2012 मध्ये एका मुलीच्या जन्मानंतर तिने स्वत: ला चित्रपटांपासून दूर ठेवले. मात्र मुलगी मोठी झाल्यानंतर तीने ओटीटी प्लॅटफॉर्मवर परत येण्याचा प्रयत्न केला.

ऐश्वर्या राय बच्चन(Aishwarya Rai Bachchan)

बिग बी अमिताब बच्चन यांची सून आणि हिंदी सिने सृष्टीतील प्रसिध्द अभिनेत्री एश्वर्या राय. प्रत्येकाला तीची ओळख आहे, आज ऐश्वर्याने स्वत: ला एक यशस्वी अभिनेत्री म्हणूनच नव्हे तर पत्नी, सून आणि आई म्हणूनही सिद्ध केले आहे. आजही तीची लोकप्रियता कायम आहे. पण एश्वर्या मुलगी आराध्याची आई झाल्यापासून चित्रपटांमध्ये काम करतांना दिसली नाही. मध्ये तीने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु स्क्रीन आणि बॉक्स ऑफिसवर पहिल्यासारखी मजल तीला मारता आली नाही.

जेनेलिया डिसूझा(Genelia D'Souza)

अभिनेत्री जेनेलिया डिसूझाने 2003 मध्ये रिलीज झालेल्या तुझे मेरी कसम या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. जेनेलिया डिसूझाने 2012 मध्ये रितेश देशमुखशी लग्न केले आणि 25 नोव्हेंबर 2014 रोजी पहिल्या मुलाला जन्म दिला. त्यानंतर 1 जून 2016 रोजी ताला दुसरा मुलगा झाला. या नंतर जेनेलिया कधीही चित्रपटांमध्ये दिसली नव्हती.

 

संबंधित बातम्या