Mouni Royच गोव्यात धमाकेदार बर्थडे सेलिब्रेशन

Mouni Royने इन्स्टा स्टोरीवर वाढदिवसाच्या आधीच्या सेलिब्रेशनचे बिकिनीमधील तिचे सुपर फोटोही शेअर केले होते
Mouni Royच गोव्यात धमाकेदार बर्थडे सेलिब्रेशन
Mouni RoyInstagram/imouniroy

मनोरंजन क्षेत्रातील सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह, नागिन फेम अभिनेत्री मौनी रॉयने (Mouni Roy) तिचा वाढदिवस (Birthday) जल्लोशात साजरा केला. मौनीने गोव्यात (Goa) मित्रांसोबत एक मोठी पार्टी ऑर्गनाइज केली होती. आपल्या मित्रांसोबत पार्टी एंजॉय करत तिने हे क्षण विस्मरणीय बनवले आहे. मौनीने तिच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनची काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यात अभिनेत्री प्रचंड आनंदात वाढदिवस सादरा करतांना दिसत आहे.

मौनीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिच्या रॉकिंग बर्थडे सेलिब्रेशनचे फोटो शेअर करून चाहत्यांना एक मनोरंजनाची मेजवानीच दिली असं म्हणायला हरकत नाही. सेलिब्रेशनच्या पहिल्या फोटोमध्ये मौनी स्विमिंग पूलच्या कडेला बसलेली दिसते. मौनीच्या वाढदिवशी अभिनेत्रीसाठी विशेष सजावटही करण्यात आली होती. मौनीने व्हिडिओमध्ये या सुंदर सजावटीसह केकचीही झलक दाखवली आहे.

Mouni Roy
अखेर आलियाने केला आपल्या प्रेमाचा खुलासा
Mouni Roy
Mouni RoyInstagram/ imouniroy

मौनी एका फोटोमध्ये केकसोबत पोज देताना दिसत आहे. मौनीच्या चेहऱ्यावर आपल्या वाढदिवसाची पार्टी गोव्यात सेलिब्रेट करण्याचा आनंद दिसत होता. मौनी सेलिब्रेशनच्या आधी स्विमिंग पूलमध्ये तिच्या मित्रांसोबत प्री-बर्थडे सेलिब्रेशन एन्जॉय करताना दिसली . मौनीने तिच्या इन्स्टा स्टोरीवर वाढदिवसाच्या आधीच्या सेलिब्रेशनची बिकिनीमधील तिचे सुपर फोटोही शेअर केले होते. मौनी बिकनीमध्ये मोकळे केस आणि न्यूड मेकअपमध्ये जबरदस्त दिसत होती.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com