आठ दिवसांत पूर्ण झालेला चित्रपट ‘21 वा टिफिन’

विजयगिरी बावा दिग्दर्शित "21 टिफिन" हा गुजराती चित्रपट ‘युनेस्को/आयसीएफटी गांधी’ या विभागामध्ये दाखवण्यात आला.
आठ दिवसांत पूर्ण झालेला चित्रपट ‘21 वा टिफिन’
आठ दिवसांत पूर्ण झालेला चित्रपट ‘21 वा टिफिन’ Dainik Gomantak

‘युनेस्को/आयसीएफटी गांधी’ या पुरस्काराची स्थापना 2015 मध्ये युनेस्को/आयसीएफटी फेलिनी मेडल म्हणून करण्यात आली होती. पण पुढच्या वर्षी 2016 मध्ये हा पुरस्कार भारतात दिला जात आहे हे लक्षात घेऊन त्यात ‘युनेस्को/आयसीएफटी गांधी’ असा बदल करण्यात आला सत्य, अहिंसा आणि प्रामाणिकपणा अशा महात्माजींच्या तत्त्वांचे पालन करणाऱ्या चित्रपटांना (Movie) हा पुरस्कार दिला जातो. या विभागात 10 चित्रपट स्पर्धा करत आहेत. 10 चित्रपटांपैकी 3 चित्रपट भारतीय चित्रपट आहेत आणि ‘21 वा टिफिन’ हा त्यापैकी एक आहे.

हा सन्मान कोणत्या तरी भारतीय चित्रपटाला मिळावा अशी इच्छा आहे. मला या चित्रपटाचे पटकथा लेखक राम मोरी आणि दोन मुख्य अभिनेत्री निलम पांचाल आणि नीत्री यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली. हा चित्रपट स्वतः राम मोरी यांनी लिहिलेल्या “महोतू” नावाच्या पुस्तकातील कथेवर आधारित आहे. या पुस्तकात ग्रामीण आणि शहरांमधील मध्यमवर्गीय महिलांच्या जीवनाविषयी 14 कथा आहेत. त्यात मध्यमवर्गीय स्त्रियांची गुंतागुंत, संवेदनशीलता आणि समस्या याविषयी सांगितले आहे. “महोतु” या शब्दाचा अर्थ आहे फरशी पुसण्यासाठी वापरण्यात येणारे कापड. या पुस्तकाला 2016 मध्ये युवा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता.

आठ दिवसांत पूर्ण झालेला चित्रपट ‘21 वा टिफिन’
सिनेमाद्वारे भारत-चीन एकत्र येणे शक्य

कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनच्या काळात अवघ्या 30 दिवसांत चित्रपटाची कथा लिहिली गेली, असे राम मोरी सांगतात. मात्र, चित्रपटाची पटकथा दिग्दर्शक विजयगिरी बावा यांनीच लिहिली. कास्टिंगही त्यांनीच ठरवलं. चित्रपटाचे शूटिंग लॉकडाऊन दरम्यान कोरोना संबधितचे सर्व नियम पाळून केले गेले. संपूर्ण शूटिंग 6 ते 13 सप्टेंबर2021 या अवघ्या 8 दिवसांत पूर्ण झाले, असे राम मोरी यांनी सांगितले.

नायिका नीलम सांगतात, लहानपणापासूनच त्या शालेय स्पर्धेत अभिनय करायच्या. वयाच्या साडेचारव्या वर्षी त्यानी माझे वडील गमावले. तिने कधीच अभिनेत्री होण्याचा विचार केला नव्हता. ती माझ्या अभ्यासात खूप हुशार होती. ती एकांकिका, नाटकात काम करायची आणि जगण्यासाठी तिने 10 वर्षे मॉडेलिंग केले. तिचा पहिला हिंदी चित्रपट “प्यार हमे किस मोड पे ले आया’ कधीच प्रदर्शित झाला नाही.. मग तिने नाटके आणि गुजराती मालिकांमध्ये काम करायला सुरुवात केली. 2019 मध्ये गुजराती चित्रपट "हिल्लारो" साठी तिला अभिनयासाठी ‘विशेष उल्लेख’ म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. तो देखील दिग्दर्शकाचा पहिला चित्रपट होता.

आठ दिवसांत पूर्ण झालेला चित्रपट ‘21 वा टिफिन’
IFFIतून कोंकणी सिनेमा पोहोचावा राज्यभरात

चित्रपटात जिद्दी मुलीची भूमिका साकारणारी नीत्री म्हणते, ती रंगभूमी कलाकारांच्या कुटुंबातूच जन्मली आहे. तिचे आई-वडील दोघेही थिएटर कलाकार आहेत. अगदी लहानपणापासून ती त्यांच्यासोबत थिएटरला जायची. बालकलाकार म्हणून तिने तिचे पहिले नाटक ती फक्त 5 वर्षांची असताना केले होते. ती आंतरमहाविद्यालयीन नाट्यस्पर्धेत भाग घ्यायची. नंतर तिने व्यावसायिक नाटकांत भाग घ्यायला सुरुवात केली. तिचा गुजरातीतील पहिला चित्रपट "चेल्लो दिवस" ​​हा विनोदी चित्रपट 2015 मध्ये ब्लॉक-बस्टर ठरला. ती सद्या मास कम्युनिकेशनमध्ये पीएचडी करत आहे.

- सतेंदर मोहन

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com