Zwigato Box Office Collection: मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे आणि झ्विगॅटो एकत्रच प्रदर्शित..दोन्ही चित्रपटांची इतकी कमाई...

राणी मुखर्जी आणि कपिल शर्मा दोघांचे चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाले आहेत...
Zwigato
Mrs Chatterjee vs Norway
Zwigato Mrs Chatterjee vs NorwayDainik Gomantak

अभिनेत्री राणी मुखर्जीचा मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे आणि कपिल शर्माची मुख्य भूमीका असलेला झ्विगॅटो हे दोन्ही चित्रपट काल म्हणजे 18 मार्च रोजी प्रदर्शित झाले आहेत. या दोन्ही चित्रपटांची प्रचंड चर्चा गेल्या काही दिवसांत झाली. हे दोन्ही चित्रपट कालच्या दिवशी एकमेकांच्या समोर उभे ठाकले आहेत.

दोन्ही चित्रपटांचे विषय भिन्न असले तरी चित्रपटातला नायक नायीकेचा संघर्ष हा कुटूंबासाठीचा आहे. अभिनेत्री राणी मुखर्जीने आजवर केलेल्या भूमीका तिच्यातल्या कसलेल्या अभिनेत्रीचाच परिचय करून देतात. कपिल शर्माच्या बाबतीत बोलायचे झाल्यास द कपिल शर्मा शो च्या माध्यमातून त्याने आतापर्यंत खळखळुन हसवलं आहे ;पण आता मात्र त्याने या गंभीर भूमीकेमधून प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. आता बघुया या दोन्ही चित्रपटांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन

दोन्ही चित्रपटांची तुलना केल्यास राणी मुखर्जीच्या चित्रपटाने झ्विगॅटोपेक्षा जास्त कमाई केली आहे. राणीच्या चित्रपटाने पहिल्या दिवशी 1.27 कोटी रुपयांची कमाई केली आहे. दुसऱ्या दिवशी चित्रपटाने 2.50 कोटी मिळवले म्हणजेच आतापर्यंत चित्रपटाने 3.77 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

Zwigato
Mrs Chatterjee vs Norway
Sanju Samson Meet Rajinikanth: 'तब्बल 21 वर्षांनंतर तो दिवस आलाच...' संजू सॅमसनचा थलायवाबरोबरचा व्हिडिओ व्हायरल

दुसऱ्या बाजूला कपिलच्या झ्विगॅटोच्या बाबत बोलायचे झाल्यास पहिल्या दिवशी 42 लाखांची कमाई केली आहे. दुसऱ्या दिवशी चित्रपटाने 65 लाख मिळवले म्हणजेच चित्रपटाची आतापर्यंतची कमाई 1.7 कोटी इतकी झाली आहे. थोडक्यात या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर आपली कमाल दाखवता आली नाही.

चित्रपटाचे इतके प्रमोशन करूनही त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. आता पुढच्या काही दिवसांत चित्रपट आपला प्रभाव कसा टिकवून ठेवतो ते पाहुया

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com