MS Dhoni: IPL 2022 नंतर धोनी करणार मोठी घोषणा

MS Dhoni Producer Tamil Films: महेंद्र धोनी तामिळ चित्रपटांमध्ये एन्ट्री करणार असल्याची चर्चा सोशल मिडियावर सुरू आहे.
MS Dhoni
MS DhoniDainik Gomantak

भारताचा माजी क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीचा साऊथ इंडियामध्ये चांगला चाहता वर्ग आहे. तमिळनाडूमध्ये धोनीचे अनेक चाहते आहेत. धोनी हा आयपीएल संघ चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super Kings) एक प्रसिद्ध चेहरा आहे. एवढेच नाही तर धोनीला साऊथचे चाहते थाला म्हणून हाक मारतात. आता महेंद्र सिंग धोनी तामिळ चित्रपटांमध्ये एन्ट्री करणार असल्याची चर्चा सोशल मिडियावर सुरू आहे. (MS Dhoni Producer Tamil Films News)

* तमिळ चित्रपटांमध्ये धोनीची एन्ट्री

धोनीची तामिळ चित्रपटांशी जवळीक वाढत आहे. यासाठी त्याने दाक्षिणात्य प्रसिद्ध अभिनेत्री नयनतारासह हातमिळवणी केली आहे. धोनी निर्माता म्हणून टॉलीवुडमध्ये येण्यासाठी सज्ज झाला आहे. धोनी निर्मित पहिल्या तमिळ चित्रपटात नयनतारा मुख्य भूमिकेत दिसणार अशी चर्चा सुरू आहे. यामध्ये संजय साथ देणार आहे.

संजय साऊथचा सुपरस्टार रजनीकांत यांच्या जवळचा आहे. धोनीच्या प्रोजेक्ट्सची अधिकृत घोषणा आयपीएल 2022 नंतर केली जाऊ शकते. या चित्रपटाचे शूटिंग लवकरच सुरू होणार असल्याचेही बोलले जात आहे. क्रिकेट नंतर महेंद्रसिंग धोनी आता तामिळ चाहत्यांच्या हृदयात आपल्या चित्रपटातून स्थान निर्माण करणार आहे.

MS Dhoni
लताजींच्या चिरंजीव सुरांची आठवण करून देणारा कार्यक्रम ‘अमर लता’

तसे, धोनी याआधी त्याचा बायोपिक चित्रपट 'एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी' च्या प्रमोशनमध्ये सहभागी झाला होता. या चित्रपटात अभिनेता सुशांत सिंग राजपूत मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटाला तामिळमधील प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले होते.

धोनीपूर्वी भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगने सुद्धा तामिळ चित्रपटांमध्ये प्रवेश केला होता. 'डिक्कीलुना' या चित्रपटात त्याने कॅमिओ केला होता. दुसरीकडे हरभजन स्पोर्ट्स ड्रामा फिल्म फ्रेंडशिपमध्ये मुख्य भूमिकेत दिसला होता.

दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा लवकरच शाहरुख खानसोबत एका चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे नाव 'लाॅयन' असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय तिच्याकडे O2, Gold, Godfather आणि Connect नावाचे तामिळ, तेलुगू आणि मल्याळम चित्रपट आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com