सवेश नाट्यगीत स्पर्धेत रंगला ‘मुजरा संगीत रंगभूमीला’

सवेश नाट्यगीत स्पर्धा व निवेदन आणि सादरीकरणातून नाट्यसंगीताचा प्रवास उलगडणारा ‘मुजरा संगीत रंगभूमीला’ या कार्यक्रमाने साजरा करण्यात आला.
सवेश नाट्यगीत स्पर्धेत रंगला ‘मुजरा संगीत रंगभूमीला’
Theater Dainik Gomantak

पणजी : इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझातर्फे (आयएमबी) रंगभूमीदिन (Theater) सवेश नाट्यगीत स्पर्धा व निवेदन आणि सादरीकरणातून नाट्यसंगीताचा प्रवास उलगडणारा ‘मुजरा संगीत रंगभूमीला’ या कार्यक्रमाने साजरा करण्यात आला.

यानिमित्ताने केंद्रीय मंत्री (Union Minister) श्रीपाद नाईक (Shripad Naik) यांच्या हस्ते संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायक - नट प्रल्हाद हडफडकर व आपा गावकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष दशरथ परब, सदस्य सचिव दिगंबर काणकोणकर, कार्यकारी सदस्य उज्‍ज्‍वला तारकर उपस्थित होत्या.

Theater
रानडुकरांप्रमाणेच खेती आणि माकडांनाही मारण्‍याची परवानगी द्या ; शेतकऱ्यांची मागणी

मुजरा संगीत रंगभूमीला कार्यक्रमात मुंबई येथील प्रसिद्ध गायक नट मुकुंद मराठे व ज्ञानेश पेंढारकर आणि गोव्यातील प्रसिद्ध गायिका प्रचला आमोणकर यांनी मराठी संगीत रंगभूमीवरील (Marathi Music Theater) गाजलेल्या नाट्यपदांची मेजवानी दिली. गोविंद भगत यांचे माहितीपूर्ण सुरेख निवेदन लाभले. दोन्ही गायकांनीही काही दुर्मिळ आठवणी सांगितल्या. सुभाष फातर्पेकर (संवादिनी), दत्तराज सुर्लकर(ऑर्गन), दत्तराज शेट्ये (तबला) यांनी साथसंगत केली.

अनुष्का थळी यांना प्रथम पारितोषिक

सवेश नाट्यगीतगायन स्पर्धेत अनुष्का थळी यांनी 5000 रुपयांचे प्रथम पारितोषिक पटकावले. तनिषा मावजेकर व राशी देसाई यांना द्वितीय पारितोषिक, तर लक्ष्मी महात्मे यांना तृतीय पारितोषिक प्राप्त झाले. राजेश बोरकर, सुरज शेटगावकर, सीमा बर्वे, हर्षा गणपुले यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली. प्रल्हाद हडफडकर व उज्ज्‍वला तारकर यांनी स्पर्धेचे परीक्षण केले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com