Isha Aambani Have Given Birth To Twins: मुकेश अंबानी बनले आजोबा, ईशाने दिला जुळ्या बाळांना जन्म

Isha Aambani: ईशा आणि आनंद पिरामल यांच्या संसारात नव्या पाहुण्यांचे आगमन झाले आहे.
Isha Aambani And Mukesh Ambani
Isha Aambani And Mukesh AmbaniDainik Gomantak

Isha Aambani: आपल्या देशातील श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानींची लाडकी लेक ईशा अंबानी-पिरामलने जुळ्या बाळांना जन्म दिला आहे. या गोड बातमीमुळे अंबानी आणि पिरामल या दोन्ही कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण आहे. मुकेश अंबानी आणि नीता अंबानी आता आजी-आजोबा बनले आहेत. याविषयी अंबानी कुटुंबाकडून एक पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.

या पत्रकात म्हटले आहे की 'आम्हाला सांगताना आनंद होत आहे की आमची मुलं ईशा आणि आनंद यांना जुळ्या बाळांच्या रुपात परमेश्वराचा आशीर्वाद मिळाला आहे. ईशा आणि तिच्या बाळांचे आरोग्य (Health) चांगले आहे. ते सगळे सुखरुप आहेत. आम्ही तुमच्याकडे ईशा, आनंद आणि त्यांच्या बाळांसाठी आयुष्यातील सर्व महत्वाच्या टप्प्यांसाठी आशीर्वाद मागत आहोत.'

Isha Aambani And Anand Piramal
Isha Aambani And Anand PiramalDainik Gomantak

तसेच, प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकातून ईशाच्या जुळया बाळांची नावे समोर आली आहेत. ईशाने जन्म दिलेल्या जुळया बाळांमध्ये एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलीचे नाव 'आदिया' तर मुलाचे नाव 'कृष्ण' असे ठेवण्यात आले आहे. ईशा अंबानीचे 2018 ला मोठ्या थाटामाटात आनंद पिरामलशी लग्न झाले.

पिरामल ग्रुपचे अजय पिरामल यांचा आनंद हा मुलगा आहे. ईशा ही मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या रिलायन्स ग्रुपच्या रिटेल व्यवसायाची प्रमुख आहे. आनंद आणि ईशाचा विवाहसोहळा तेव्हा खूप चर्चेत होता. लग्नाचा खर्च, त्यावेळी झालेले कार्यक्रम, विवाहसोहळ्याला आलेले मोठे सेलिब्रिटी, खेळाडु, उद्योगपती, नेते या सगळ्याची खूप चर्चा झाली. आता ईशा आणि आनंद पिरामल यांच्या संसारात नव्या पाहुण्यांचे आगमन झाले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com