कॉमेडियन भारती सिंग व हर्ष लिम्बाचिया यांचा जामीन अर्ज मंजूर

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 23 नोव्हेंबर 2020

 मुंबई महानगर दंडाधिकारी न्यायालयाने कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा नवरा हर्ष लिम्बाचिया यांना दिलासा देत 15 हजारांच्या जातमुचलक्यावर दोघांचा जामीन मंजूर केला. गांजा सेवन व एनसाबीच्या छाप्यामध्ये घरात गांजा सापडल्याप्रकरणी दोघांना अटक केल्यानंतर 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी  सुनावण्यात होती.

मुंबई :  मुंबई महानगर दंडाधिकारी न्यायालयाने कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा नवरा हर्ष लिम्बाचिया यांना दिलासा देत 15 हजारांच्या जातमुचलक्यावर दोघांचा जामीन मंजूर केला. गांजा सेवन व एनसाबीच्या छाप्यामध्ये घरात गांजा सापडल्याप्रकरणी दोघांना अटक केल्यानंतर 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी  सुनावण्यात होती. हा दिलासा देताना या दोघांनी गांजाचा व्यावयायिक वापर केलेला नाही, तो फक्त वैयक्तिकरित्या वापरल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) विनोदी कलाकार भारती सिंहच्या घरावर शनिवारी छापा टाकला. त्या वेळी तिच्या घरात अमली पदार्थ सापडल्याने एनसीबीने तिला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत भारती आणि तिचा पती हर्षने अमली पदार्थांचे सेवन करत असल्याची कबुली दिल्यानंतर एनसीबीने तिला एनपीडीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली. या वेळी भारतीची चार तास, तर हर्षची तब्बल 18 तास एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली होती, त्यानंतर त्यादेखील अटक करण्यात आली. या दोघांना एनसीबी कठडी नाकारून न्यायालयाने चार डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती.

 

संबंधित बातम्या