Salman Khan: दबंग सलमान खानला पुन्हा धमकी, सरकारने केली सुरक्षेत वाढ

बॉलिवुडचा भाईजान सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी आली आहे.
Salman Khan Threat Mail
Salman Khan Threat MailDainik Gomantak

Salman Khan Threat Mail: सिद्धू मुसेवाला याची हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी आणि गँगस्टर गँगस्टर गोल्डी ब्रार, लॉरेन्स बिश्नोई यांनी बॉलिवुडचा प्रसिद्ध अभिनेता सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी दिली होती.

तसेच खंडणीची मागणी देखील केली होती. या घटनेमुळे खळबळ उडाली होती. दरम्यान, मुंबई पोलिसांनी सलमानच्या सुरक्षेत वाढ केली होती.

पण पुन्हा सलमान खानला जीवे मारण्याचा ई मेल आल्याने खबळल उडाली आहे. या मुळे सलमान खानचे कुटुंबीय चांगलेच हादरले आहे. सलमान खान याला काही दिवस सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सलमान खानच्या (Salman Khan) ऑफिसच्या मेल आयडीवर 18 मार्च रोजी हा मेल आला आहे. यात मॅटर क्लोज करायचा असेल तर फेस टू फेस चर्चा कर, नाहीतर पुढच्या वेळी झटका दिला जाईल अशी धमकी सलमान खान याला दिली आहे.

रोहित गर्ग नावाच्या आयडीवरुन हा धमकीचा मेल आला आहे. यात गँगस्टर गोल्डी ब्रारची नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी सलमान खानचंय सुरक्षेत आणखी वाढ केली असून खबरदारीचा उपाय म्हणून त्याला सार्वजनिक कार्यक्रमांपासून सुरू राहण्याचा सल्ला पोलिसांनी दिला आहे.

या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस या ईमेलचा शोध घेत आहेत. गँगस्टर गोल्डी ब्रार, लॉरेन्स बिश्नोई आणि रोहित गर्ग यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Salman Khan Threat Mail
Tu Jhoothi Main Makkaar Box Office Collection: रणबीर-श्रद्धाच्या ‘तू झुठी मैं मक्कार’ने पार केला 100 कोटींचा टप्पा...

काय आहे नेमकं प्रकरण

काही दिवसांपूर्वी सलमान खान आणि त्याचे वडील लेखक सलीम खान यांना धमकीचे पत्र मिळाले होते. या पत्रात त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. सलमान खानचे वडील सलीम खान हे सकाळी जॉगिंगसाठी गेले होते.

तिथे ते एका बेंचवर बसले असता त्यांना एक पत्र मिळाले होते. या पत्रात लिहिले होत की, सलमान खान याचा सिद्धू मुसेवाला करुन टाकू. पत्रामध्ये 'एलबी' असा उल्लेखा होता. एलबी हा लॉरेन्स बिश्नोई असल्याचा संशय पोलिसांना आहे.

बिश्नोई टोळीचा प्रमुख लॉरेन्स बिष्णोई अवघ्या 28 वर्षांचा आहे, तर त्याच्या टोळीतील सदस्य वीस ते पंचवीस वयोगटातील आहेत. मात्र, इतक्या कमी वयात या सर्वांवर हत्या, खंडणी, हत्येचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे नोंद आहेत. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com