स्टँड-अप कॉमेडीयन मुनवर फारूकीचा गोव्यात होणारा शो रद्द का झाला?

या काळात कोणती कॉमेडी कोणाच्या भावना दुखावेल आणि कोणाच्या भावना सुखावेल हे सांगणे कठीणच..
स्टँड-अप कॉमेडीयन मुनवर फारूकीचा गोव्यात होणारा शो रद्द का झाला?
Goa : show of stand-up comedian Munawar Faruqui Dainik Gomantak

सार्वत्रिक

स्टँड-अप कॉमेडी

मुनवर फारूकी (Munawar Faruqui) या स्टँड-अप कॉमेडीयनचा (Stand-up comedian) गोव्यात (Goa) होणारा शोदेखील रद्द झाला आहे. जेव्हापासून हिंदु देवतांचे विडंबन केल्याबद्दल त्याला मध्यप्रदेशमध्ये 37 दिवस तुरुंगात काढावे लागले तेव्हापासून देशभर ठरलेले त्याचे कार्यक्रम रद्द व्हायला लागले आहेत. अर्थात ही अशी बंदी एखाद्या कलाकारावर घालावी की नाही यासंबंधी वाद विवाद चालूच आहे. हे वाद विवाद चालूच राहतील. लोकांच्या भावना दुखायचा ‘भयंकर काळ’ सुरू झाला आहे आणि या काळात कोणती कॉमेडी कोणाच्या भावना दुखावेल आणि कोणाच्या भावना सुखावेल हे सांगणे कठीण झाले आहे. गोव्यात तर निवडणुका जवळ आल्या आहेत त्यामुळे ‘भावनांची खेळणे’ हा प्रकार या काळात अतिशय गांभीर्याने घेतला जाईलच.

Goa : show of stand-up comedian Munawar Faruqui
म्हणून इफ्फी हवी!

1947 आली आमच्या देशाला मिळालेले स्वातंत्र्य हे मुळात स्वातंत्र्य नव्हते, ती भीक होती हे नवीन ज्ञान आज जेव्हा कंगना किंवा विक्रम गोखले यांसारख्याकडून मिळते तेव्हा 1947 सालापासून ‘आपल्याला स्वातंत्र्य मिळाले’च्या भ्रमात जगलेल्या पिढीच्या अख्ख्या आयुष्याची स्टँड-अप कॉमेडी बनुन जाते. आयुष्य अगदी अल्बर्ट काम्यूच्या कादंबरीत मांडल्यासारखे असंगत होत जाते. खरं म्हणजे अशी ‘स्टैंड-अप कॉमेडी’ करणारे मोकळे असायला हवेत आणि इतर शहाण्या-सुरत्यांनी निमूटपणे तुरूंगात जाऊन स्वतःला या असंगत जगापासून बेदखल करून घ्यायला हवे. तरच त्यांना या कॉमेडीकाळात मनाची शांती लाभू शकेल.

‘स्टँड-अप कॉमेडी’ करणाऱ्यांची संख्या जगात कमी नाही. कुणीतरी कवींबद्दल असे म्हटले आहे, जगात दोन प्रकारचे कवी आहेत- एक लिहिणारे कवी, दुसरे न लिहिणारे कवी! हे वर्णन स्टँड-अप कॉमेडीयनाना देखील तंतोतंत लागू होते. स्टेजवर आपली कॉमेडी सादर करणारे आणि आपल्या बोलण्याने किंवा वर्तनाने कॉमेडी निर्माण करणारे असे दोन प्रकारचे कॉमेडियन आपण नेहमीच पाहतो. स्टेजवर स्टँड-अप कॉमेडी सादर करून लोकांच्या भावना दुखावणाऱ्या स्टँड-अप कॉमेडीयनाना अपराधी ठरवून त्यांना सजा फर्मावणे हे फार सोपे असते.मात्र आपल्या अतार्किक वागण्याने साऱ्या समाजाशी खेळून मौजमजा करणाऱ्यांचे काय करावे हे मात्र आपल्याला ठरवता येत नाही.

Goa : show of stand-up comedian Munawar Faruqui
लाल सिंह चड्ढा Movie ची रिलीज डेट अचानक बदलली..!

कंगना काय किंवा वारेमाप आश्वासनांवर जनतेला झुलवत ठेवणारे जुमलेबाज राजकारणी काय, अशांची स्टॅन्ड-अप कॉमेडी दुर्दैवाने हसत हसता हसता आपल्या डोळ्यातून पाणी आणते की नाही?

अलिकडेच जन्माला आलेली ही स्टँड-अप कॉमेडी’ नेमकी आहे तरी कशी हे जाणण्यासाठी गोव्यातल्या नामांकित स्टॅंड-अप कॉमेडियन साईदत्त कामत ह्याला जेव्हा फोन केला, तेव्हा साईदत्त म्हणाला, ‘त्यातला विनोद निखळ असायला हवा. आपण करत असलेल्या विनोदामुळे कुणी दुखावला जाता कामा नये.’ साईदत्तचे ते वाक्य ऐकून, हे आजच्या काळात शक्य असेल का हा प्रश्न मनात उभा राहिला पण या प्रश्नाचे उत्तर साईदत्तनेच दिले- “आज सर्वसामान्य प्रेक्षकच स्टॅन्ड-अप कॉमेडी मधून वीभत्सतेची अपेक्षा करतात. इंस्टाग्राम किंवा इतर ऑनलाईन माध्यमातून अशा तथाकथित स्टैंड-अप कॉमेडींचे सादरीकरण आपण पाहतो तेव्हा ह्या कॉमेडियनना मिळणाऱ्या प्रचंड प्रतिसादातून लोकांचा कलही आपल्याला कळून येतो. हे सारे दुर्दैवी आहे पण हा सारा ‘गेम ऑफ फॉलोअर्स’ आहे.”

साईदत्त अगदी खरे बोलत होता. आज जिथे फॉलोअर्स विकत घेण्याची व्यवस्था आहे, तिथे चांगले, अभिजात असे काही मांडण्याची गरजच काय आहे? साईदत्तच्या म्हणण्याप्रमाणे या क्षेत्रात फक्त दहा टक्के लोक चांगला आशय असणारी निर्मिती करणारे आहेत तर उरलेले 90 टक्के अशिष्ट अशा प्रकारची निर्मिती करून नाव कमावतात. पण हे सारे सांगून झाल्यावर साईदत्त आणखी एक सत्य बोलून गेला, ‘हे फक्त ‘स्टॅन्ड-अप कॉमेडी’पुरते मर्यादित नाही. आज बहुतेक साऱ्याच क्षेत्रात अशा प्रकारच्या उथळपणाची आणि विभत्सतेची चलती आहे.’

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com