'त्या' शब्दाचा अर्थ माहिती नव्हता म्हणत बबिताने मागितली माफी

दैनिक गोमंतक
सोमवार, 10 मे 2021

मुनमुनने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये एका विशिष्ट जातीबद्दल भाष्य केल होते.

'तारक मेहता का उलटा चश्मा' (Tarak Mehta ka Ulta Chashma) मध्ये बबिताची व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता तिच्या एका व्हिडिओबद्दल बरीच चर्चेत राहिली आहे. मुनमुनच्या एका व्हिडिओमुळे ती सोशल मीडियावर चर्चेत आली . मात्र अभिनेत्री मुनमुन दत्ताच्या (Munmun Dutta) चर्चेत येण्याचे कारण वादग्रस्त होते. अभनेत्रीने एक वादग्रस्त व्हडिओ (Controversial Video)  शेअर केला असल्याचे तिच्या विरोधात सोशल मीडियावरून जोरदार टीका झाल्याचे पाहायला मिळाले आहे. आता मुनमून दत्ताने त्या व्हिडीओ बदल स्पष्टीकरण देत माफी मागीतली आहे.(Munmun Dutta apologizes for the controversial video.) 

मुनमुनने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये एका विशिष्ट जातीबद्दल भाष्य केल होते. त्यानंतर तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि नेटकऱ्यांनी मुनमुन दत्ता यांच्याविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. एवढ्यावरच न थांबता लोकांनी अभिनेत्रींच्या अटकेची देखील मागणी केली आहे. सोशल मीडियावर हा मुद्दा मोठ्या चर्चेत आला आणि हे प्रकरण गंभीर होत जात असल्याचे लक्षात येताच अभिनेत्री मुनमुन दत्ताने त्याबद्दल स्पष्टीकरण दिल. 

मुनमुन दत्ताने यावर माफी मागताना, ' हे स्पष्टीकरण त्या व्हिडीओ बद्दल आहे जो मी काल पोस्ट केला होता. त्या व्हिडीओ मध्ये मी उल्लेख केलेल्या एका शब्दाचा चुकीचा अर्थ काढला जातो आहे. मात्र हे कुणाचा अपमान करण्यासाठ, धमकी देण्यासाठी किंवा कुणाच्या भावना दुखावण्यासाठी केलेलं नाही. भाषेबद्दल असणाऱ्या अडथळ्यांमुळे मला त्या शब्दाबद्दल चुकीची माहिती होती" अशा आशयाचे स्पष्टीकरण दिले आहे. 

'बिग बीं' ची दिल्लीतील कोविड सेंटरसाठी 2 कोटींची मदत

तसेच 'मला त्या शब्दाचा अर्थ काळाला, तेव्हा मी लगेच तो भाग काढून टाकला. मला प्रत्येक जाती, वंशाच्या किंवा लिंगातील प्रत्येक व्यक्तीबद्दल मनापासून आदर आहे आणि आमच्या समाजासाठी किंवा राष्ट्रासाठी त्यांचे अपार योगदान मी मान्य करते . या शब्दाच्या वापरामुळे अनवधानाने दुखावले गेलेल्या प्रत्येक व्यक्तीची मला मनापासून दिलगिरी व्यक्त करायची आहे आणि त्याबद्दल मला वाईट वाटतेआहे.' अशा भावना देखील मुनमुन दत्ताने यावेळी व्यक्त केल्या आहेत.

संबंधित बातम्या