‘ए मेरे वतन के लोगो’ या गाण्याचा विशालने सांगितला चुकीचा इतिहास

गोमंन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 26 जानेवारी 2021

भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांच्याविषयी चूकिचे वक्तव्य केलेल्यामुळे प्रसिद्ध गायक- संगीतकार विशाल ददलानी सोशल मिडियावर ट्रोल होत आहे.

नवी दिल्ली: भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांच्याविषयी चुकीचे वक्तव्य केलेल्यामुळे प्रसिद्ध गायक- संगीतकार विशाल ददलानी सोशल मिडियावर ट्रोल होत आहे. छोट्या पडद्यावरील इंडियन आयडॉल या गाणाच्या रीयालिटी  शोमध्ये 'ये मेरे वतन के लोगो' या गाण्याचा चुकीचा इतिहास सांगितल्यामुळे बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक-संगीतकार विशाल ददलानीला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

इंडियन आयडॉल या गाण्याच्या कार्यक्रमात एका स्पर्धकाने ‘ऐ मेरे वतन के लोगो’ हे गीत सादर केले होते. हे गीत ऐकल्यानंतर विशालने त्या स्पर्धकाचे कौतूक केले आणि तिला या गाण्यामागचा इतिहास सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, विशालने हि माहिती देतांना चुकीचा संदर्भ दिल्यामुळे त्याच्यावर ट्रोल होण्याची वेळ आली आहे. ‘प्रसिध्द गायिका लता मंगेशकर यांनी ‘ए मेरे वतन के लोगो’ हे गीत 1947 मध्ये पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यासमोर गायले होते,’ असे विशाल ददलानी म्हणाला. त्याचे हे वाक्य ऐकून नेटकऱ्यांनी त्याच्या या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. अनेकांनी त्याला इतिहास नीट वाचण्याचा सल्लासुध्दा दिला आहे. त्याच्या वक्तव्याचा निषेधही केला जात आहे. सोबतच चुकीचा इतिहास सांगणाऱ्या व्यक्तीला परिक्षक पदावरुन हटवा असे नेटकऱ्यांनी म्हटले आहे.  या सगळ्या प्रकारानंतर विशाल ददलानीने माफी मागत चूकीचे वक्तव्य केल्याबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे. मात्र त्याचे ते विधान त्याला चांगलेच त्रासदायक ठरले आहे.

1962 मध्ये भारत-चीन युद्धादरम्यान शहिद झालेल्या भारतीय जवानांच्या स्मरणार्थ लता मंगेशकर यांनी हे गाणं गायलं होतं. कवी प्रदीप यांनी हिंदीमध्ये हे गाणं लिहिलं असून लता मंगेशकर यांनी 26 जानेवारी 1963 मध्ये दिल्ली येथे गायलं होतं. दरम्यान, लता मंगेशकर यांनी 1962 मध्ये भारत-चीन युद्धादरम्यान शहिद झालेल्या भारतीय जवानांच्या स्मरणार्थ हे गीत गायले होते. या चीनी हल्ल्यात शहिद झालेल्या भारतीय सैनिकांना हे गीत समर्पित होते. कवी प्रदीप यांनी हिंदीमध्ये लिहिलेल्या या गीताला सी. रामचंद्र यांनी संगीतबध्द केले होते आणि लता मंगेशकर यांनी हे गीत 26 जानेवारी 1963 मध्ये दिल्ली येथे गायले होते.

संबंधित बातम्या