Anupam Kher on The Kashmir Files : 'चित्रपटातील माझे अश्रू आणि वेदना खऱ्या'; अनुपम खेर झाले भावूक

द काश्मीर फाईल्स चित्रपटाने पडद्यावर काश्मिरी पंडितांची शोकांतिका दाखवून त्यांच्या वेदनांचे घाव भरण्याची प्रक्रिया सुरू केली, असंही अनुपम खेर म्हणाले आहेत.
Anupam Kher | IFFI Goa 2022
Anupam Kher | IFFI Goa 2022PIB | Dainik Gomantak

Anupam Kher on The Kashmir Files : 'काश्मीर फाईल्स' मुळे जगभरातील लोकांना 1990 च्या दशकात काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचारांची जाणीव होण्यास मदत झाली, असे चित्रपटातील प्रमुख अभिनेते अनुपम खेर म्हणाले. गोव्यातील पणजी येथे 53 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवानिमित्त आयोजित इफ्फी टेबल टॉक्समध्ये ते सहभागी झाले होते.

The Kashmir Files हा सत्य घटनांवर आधारित चित्रपट आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी या चित्रपटासाठी जगभरातल्या  सुमारे 500 लोकांच्या मुलाखती घेतल्या. 19 जानेवारी 1990 च्या रात्री वाढत्या हिंसाचारामुळे काश्मीर खोऱ्यातील 5 लाख काश्मिरी पंडितांना त्यांची घरे आणि तिथल्या आठवणी मागे सोडून जावे लागले होते.

एक काश्मिरी हिंदू म्हणून मी या दुःखद घटनांसोबत जगलो. मात्र असे काही घडले हे कुणीच मान्य करत नव्हते. जग ही शोकांतिका लपवण्याचा प्रयत्न करत होतं. मात्र काश्मीर फाईल्सने पडद्यावर ही शोकांतिका दाखवून त्यांच्या वेदनांचे घाव भरण्याची  प्रक्रिया सुरू केली असल्याचं अनुपम खेर यांनी म्हटलं आहे.

Anupam Kher | IFFI Goa 2022
IFFI 2022: गोव्यात 'द काश्मीर फाइल्स'चे स्क्रीनिंगला अनुपम खेर यांची हजेरी, सेल्‍फी काढण्‍यासाठी चाहत्यांची उडाली झुंबड

काश्मिरी पंडितांनी भोगलेली शोकांतिका पुन्हा जागवताना अनुपम खेर म्हणाले, द काश्मीर फाईल्स हा त्यांच्यासाठी केवळ एक चित्रपट नाही, तर त्यांनी पडद्यावर चित्रित केलेली एक भावना आहे.  'ज्या लोकांना त्यांच्या घरातून हाकलून देण्यात आले, त्यांचे मी प्रतिनिधीत्व करत असल्याने, ते शक्य तितक्या चांगल्या पद्धतीने व्यक्त करणे ही माझी मोठी जबाबदारी होती. माझे अश्रू, माझ्या वेदना ज्या तुम्ही या चित्रपटात पाहत आहात ते सगळे खरे आहे, असं सांगताना अनुपम खेर भावूक झाले.

दरम्यान कोविड महामारी आणि त्यानंतरच्या लॉकडाऊनचा चित्रपट पाहण्याच्या लोकांच्या पद्धतीवर परिणाम झाला आहे. या वस्तुस्थितीवर अधिक भर देत अनुपम खेर म्हणाले, OTT प्लॅटफॉर्ममुळे प्रेक्षकांना जागतिक चित्रपट आणि बहुभाषिक चित्रपट पाहण्याची सवय लागली आहे. प्रेक्षकांना वास्तववादी चित्रपट आवडू लागले. ज्या चित्रपटांमध्ये वास्तवाचा घटक आहे ते नक्कीच प्रेक्षकांच्या मनाला भिडतील. काश्मीर फाईल्स सारख्या चित्रपटांचे यश हे त्याचेच द्योतक आहे. कुठलीही गाणी, विनोद नसलेला हा चित्रपट अजूनही सरस ठरत आहे. हाच  खरे तर सिनेमाचा विजय आहे, अशा शब्दात अनुपम खेर यांनी आपल्या प्रेक्षकांचेही आभार मानले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com