अक्षयच्या 'लक्ष्मी बॉम्ब'चं नाव बदललं..काय असेल नवं नाव ?

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 29 ऑक्टोबर 2020

अभिनेता अक्षय कुमारची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात कियारा अडवाणीनेही महत्वपूर्ण भूमिका केली आहे. अक्षय या चित्रपटात एका ट्रान्सजेंडरची भूमिका साकारत असून हा चित्रपट येत्या ९ नोव्हेंबरला डिस्ने प्लस हॉटस्टारवरून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मुंबई- प्रदर्शनाआधीच चर्चेत आलेल्या अभिनेता अक्षय कुमारच्या लक्ष्मी बॉम्ब या चित्रपटाच्या शीर्षकात अचानक बदल करण्यात आला आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरूण आदर्श यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली. या चित्रपटाच्या शीर्षकावरून वाद निर्माण झाला होता. मात्र, या चित्रपटाचं शीर्षक बदलून ‘लक्ष्मी’ एवढंच ठेवण्यात आलं आहे.

अभिनेता अक्षय कुमारची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात कियारा अडवाणीनेही महत्वपूर्ण भूमिका केली आहे. अक्षय या चित्रपटात एका ट्रान्सजेंडरची भूमिका साकारत असून हा चित्रपट येत्या ९ नोव्हेंबरला डिस्ने प्लस हॉटस्टारवरून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाच्या वीतरणाची तारीख जवळ आलेली असताना निर्माते त्याचे शीर्षक बदल करतील काय पाहणं औचित्याचं ठरेल.

संबंधित बातम्या