Goa IFFI 53: पंतप्रधान मोदींनी दिल्या 'इफ्फी' ला शुभेच्छा

Goa Latest News: गोव्यात 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान 'इफ्फी' (IFFI) हा महोत्सव पार पडणार आहे
Goa IFFI 53| PM Modi
Goa IFFI 53| PM ModiGoa IFFI 53:

भारताचा सर्वात मोठा चित्रपट महोत्सव (IFFI) उद्यापासून सुरु होणार आहे. गोव्यात (Goa) 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान हा महोत्सव पार पडणार आहे. या चित्रपट महोत्सवाला आता पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. पॅनल चर्चा आणि भारतातील विविध चित्रपटांची झलक या चित्रपट महोत्सवात पाहायला मिळणार आहे.

यंदा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रख्यात स्पॅनिश चित्रपट निर्माते कार्लोस सौरा यांना सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. या महोत्सवाला मोदींनी शुभेच्छा दिल्या आहेत.

माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि गोवा सरकार (Goa Government) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या चित्रपट महोत्सवाबद्दल (Film Festival) पंतप्रधान मोदींनी एक पोस्ट शेअर केली. यामध्ये लिहिले की, 'इफ्फी हा भारताचा सर्वात मोठा चित्रपट महोत्सव आहे. इफ्फी (IFFI) आणि भारतीय चित्रपटांनी जागतिक मंचावर स्वत:साठी एक स्थान निर्माण केले आहे. चित्रपट महोत्सवाशी निगडीत सर्वांना हार्दिक शुभेच्छा. 53 वा इफ्फी चित्रपट मोहोत्सव यशस्वी होवो.'

Goa IFFI 53| PM Modi
Goa IFFI 53: आतंरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'दृश्यम 2' चे होणार स्पेशल स्क्रीनिंग, सिंघम लावणार हजेरी

गोव्यात (Goa) होणाऱ्या इफ्फीमध्ये (IFFI) चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार हजेरी लावणार आहेत. मराठीसह हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांचे खास स्क्रिनिंग होणार आहे. 'थ्री ऑफ अस', 'द स्टोरी टेलर', 'मेजर', 'सिया', 'द कश्मीर फाइल्स' हे हिंदी चित्रपट दाखवले जाणार आहेत. तसेच एस.एस राजामौलींचा 'आरआरआर' (RRR) हे तेलुगू वर्जनमधील चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.  

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पाच मराठी चित्रपटांची (Marathi Movie) गनिवड करण्यात आली आहे. यात विक्रम पटवर्धन यांचा 'फ्रेम', दिग्पाल लांजेरकचा 'शेर शिवराज', डॉ. सलील कुलकर्णी यांचा 'एकदा काय झालं', प्रवीण तरडे यांचा 'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे' आणि शेखर रणखांबे यांच्या 'रेखा' या चित्रपटांचा समावेश आहे. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com