Oscar Awards: ऑस्करमध्ये अवघ्या एका मताने हुकले 'मदर इंडिया'चे विजेतेपद

काळजीचे प्रेमात रूपांतर झाले आणि नर्गिस आणि सुनील दत्त यांनी लग्न केले.
Mother India movie poster
Mother India movie posterTwitter

मदर इंडिया हा भारतातील महान चित्रपटांपैकी एक मानला जातो, ज्याने केवळ आपल्या देशातच नाही तर परदेशातही आपली जादू दाखवली होती. अनेक प्रकारे, हा चित्रपट भारतातील सर्वात ऐतिहासिक चित्रपटांपैकी एक मानला जातो. हा चित्रपट सन 1957 मध्ये प्रदर्शित झाला होता आणि या चित्रपटाला इतकी लोकप्रियता मिळाली की त्यामुळे या वर्षीच्या ऑस्कर पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट विदेशी चित्रपटासाठीही नामांकन मिळाले होते. (Mother India)

हा चित्रपट मेहबूब खान (Mehboob Khan) यांनी दिग्दर्शन केला होता. या चित्रपटात नर्गिस राधाच्या भूमिकेत दिसली होती. राधाचा नवरा श्यामू एका अपघातात गंभीर जखमी झाला, त्यानंतर तो काम करू शकला नाही, असे या चित्रपटात दाखवण्यात आले होते. अशा स्थितीत गावकऱ्यांना लाजून तो घर सोडतो आणि दोन मुलांची जबाबदारी राधाच्या खांद्यावर येते.

उपासमार, वादळ, पूर आणि दांभिक जमीनदार अशा अनेक कठीण परिस्थितीत राधा आपल्या मुलांना वाढवते. इतकंच नाही तर चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये आईची भूमिका अशा पातळीवर नेऊन ठेवते की तिला लोकं मदर इंडिया म्हणतात. या चित्रपटाचे दिग्दर्शक मेहबूब खान त्यांच्या पत्नीसह ​​ऑस्कर सोहळ्यात सहभागी होण्यासाठी हॉलिवूडमध्ये पोहोचले होते. या चित्रपटानंतर मेहबूब यांनी सन ऑफ इंडिया नावाचा चित्रपटही बनवला होता, जो बॉक्स ऑफिसवर आपत्तीजनक ठरला होता.

Mother India movie poster
फ्रान्समध्ये 'Cannes' ची झलक, पाहा मंत्र्यांसह बॉलिवूड अभिनेत्यांचा जलवा

मात्र तिसऱ्या मतदानानंतर अवघ्या एका मतामुळे मदर इंडियाला ऑस्कर मिळू शकला नव्हता. सर्वोत्कृष्ट विदेशी चित्रपटाचा पुरस्कार त्या वर्षी इटालियन निर्माता डिनो डी लॉरेटिनच्या नाईट्स ऑफ कॅबिरिया या चित्रपटाला मिळाला. या चित्रपटादरम्यान सुनील दत्त नर्गिसच्या जवळ आले.

या चित्रपटातील आगीचे दृश्य गुजरातमधील सुरत शहरात शूट करण्यात आले होते. त्यावेळी नर्गिसला आगीच्या ज्वाळांमध्ये पळावे लागेल असे सांगण्यात आले होते, मात्र वाऱ्याची दिशा बदलल्याने आग पसरली. तेव्हा नर्गिस आगीत अडकल्या होत्या. या चित्रपटात सुनील दत्तने नर्गिसच्या मुलाची भूमिका केली होती, त्याने तिची सुटका करून तिला वाचवले होते. सुनील दत्तने ब्लँकेट घेऊन आगीत उडी मारली आणि नर्गिसला वाचवले होते.

Mother India movie poster
शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा अडचणीत, मनी लाँड्रिंग प्रकरणात ED ने नोंदवला FIR

त्यादरम्यान सुनीलच्या छातीवर आणि चेहऱ्यावर जखमा झाल्या होत्या.आणि त्यांना तापही खूप चढला होता. यादरम्यान नर्गिसने खूप मदत केली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यादरम्यान नर्गिस आणि सुनील दत्त जवळ आले आणि काळजीचे प्रेमात रूपांतर झाले.आणि दोघांनीही लवकरच लग्न केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com