'बॉम्बे बेगम' मधील दृष्यांवर बाल हक्क आयोगाचा आक्षेप; नेटफ्लिक्सला बजावली नोटीस

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 12 मार्च 2021

नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाईल्ड राइट्स कमिशनने गुरुवारी स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सला वेबसिरीज, 'बॉम्बे बेगम'चे प्रसारण थांबविण्यास सांगितले. राष्ट्रीय बाल हक्क संस्थेने स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मला नोटीस बजावली आणि त्याद्वारे केलेल्या कारवाईबाबत 24 तासात सविस्तर अहवाल मागविला आहे.

मुंबई :  नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाईल्ड राइट्स कमिशनने गुरुवारी स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सला वेबसिरीज, 'बॉम्बे बेगम'चे प्रसारण थांबविण्यास सांगितले. राष्ट्रीय बाल हक्क संस्थेने स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मला नोटीस बजावली आणि त्याद्वारे केलेल्या कारवाईबाबत 24 तासात सविस्तर अहवाल मागविला आहे. याचे पालन न केल्यास, या अमेरिकन कंपनीविरूद्ध “उचित कायदेशीर कारवाई” सुरू करण्याचा इशारा या संस्थेने नेटफ्लिक्सला दिला आहे.

Mahashivaratri 2021: सोनू सुद वर का भडकले शिवभक्त; युजर्स म्हणाले, हिंदू धर्माबद्दल विनामूल्य ज्ञान देऊ नको

8 मार्च रोजी नेटफ्लिक्सवर सुरू करण्यात आलेल्या सहा भागातील वेब सिरीज बॉम्बे बेगम्स, मुंबईतील 5 महिलांवर आधारित आहे, लिप्स्टिक अंडर माय बुरखाच्या चित्रपट निर्मात्या अलंक्रिता श्रीवास्तव यांनी या वेब सिरीजचे दिग्दर्शन केले आहे. या शोमध्ये महत्वाकांक्षी, आपले काम व वैयक्तिक आयुष्यात संतुलन राखण्याचा प्रयत्न करणाऱ्या स्त्रिया, त्यांच्या आयुष्यातील पुरूष, त्यांच्या मुले यांच्याबरोबर असेले त्यांचे नाते व त्यांचे स्वत:च्या शरीराशी असलेले नाते यावर प्रकाश टाकला आहे. यामध्ये अमृता सुभाष, प्लाबिता बोर्थाकुर, आद्य आनंद, राहुल बोस, विवेक गोम्बर आणि डॅनिश हुसेन पूजा भट्ट, शहाना गोस्वामी  यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाईल्ड राईट्सने सांगितले की या शोच्या काही दृश्यांविषयी दोन ट्विटर हँडलवरून तक्रार मिळाली आहे. बॉम्बे बेगममध्ये आक्षेपार्ह दृष्य दाखवले आहे, ज्यात 13 वर्षांची मुलगी कोक स्नॉर्ट करीत आहे. कारण ती पार्टी ही पूर्णत: दारू आणि ड्रग्जविषयी आहे, असे राष्ट्रीय बाल हक्क संस्थेने सांगितले आहे. 

'लग रहा हूं न मजनू भाई की पेंटिंग जैसा' म्हणत विक्की कौशलने केला असा काही स्टंट

यापुढे या नोटिशीत जेम्स ऑफ बॉलिवूड नावाच्या ट्विटर अकाऊंटने केलेल्या चिठ्ठीचा हवाला देण्यात आला आहे. यामध्ये लहान मुलांची अशी दृष्ये चित्रीत करण्यास आक्षेप घेतला आहे. कमिशनने ट्विटर वापरकर्त्याच्या आक्षेपांना “गंभीर” म्हटले आहे आणि म्हटले आहे की इंटरनेट आणि ओटीटीसमवेत कोणत्याही माध्यमांच्या व्यासपीठावर अशा प्रकारे भारतीय मुलांचे प्रतिनिधित्व, चित्रण आणि गौरव करण्याची परवानगी त्यांना देण्यात आलेली नाही. 

संबंधित बातम्या