नॅशनल क्रश रश्मिकाने शेअर केले बालपणीचे फोटो

गोमंन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 21 मे 2021

नॅशनल क्रश,(National Crush) दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदानाचा(Rashmika Mandanna) मोठा फॅन वर्ग आहे. दक्षिणेकडील चित्रपटसृष्टीत उतरल्यानंतर आत बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास रश्मिका सज्ज आहे. तिच्याकडे बॉलिवूडचे एक नाही तर दोन चित्रपट आहेत.

नॅशनल क्रश,(National Crush) दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदानाचा(Rashmika Mandanna) मोठा फॅन वर्ग आहे. दक्षिणेकडील चित्रपटसृष्टीत उतरल्यानंतर आत बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास रश्मिका सज्ज आहे. तिच्याकडे बॉलिवूडचे एक नाही तर दोन चित्रपट आहेत. ज्यांच्या शूटिंगमध्ये ती सध्या व्यस्त आहे. रश्मिका नेहमीच सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असते. सध्या तिने आपले बालपणीचे गोंडस आणि ग्लॅमरस फोटो चाहत्यांसाठी शेअर केले आहे. ते फोटो पाहून तीचे चाहते खूप खूश झाले आहेत.(National Crush Rashmika shared childhood photos)

Friends Reunion Trailer: 17 वर्षानंतर न्यूयॉर्कमध्ये पुन्हा भेटणार सहा मित्र

रश्मिकाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट होताच व्हायरल झाले आहे. आपल्या किलर स्टाईलने सर्वांची मने जिंकणाऱ्या रश्मिकाने तिच्या बालपणीचे फोटो शेअर करत पुन्हा  फॅन्स ना वेड लावलं आहे. या फोटोंमध्ये ती इतकी गोंडस दिसत आहे की तीला बघून कोणीही तिच्या प्रेमात पडेल. रश्मिकाने या गोंडस फोटोला, "मी प्रिय कोरोनाच्या जाण्याची वाट बघत आहे. असे कॅप्शन दिले आहे. या फोटोला 24 लाखाहून अधिक लोकांनी लाइक केले आहे. रश्मिकाचे अनेक मित्र आणि चाहते या फोटोवर कमेंट करत आहेत. रश्मिकाने नुकताच इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती फुलं दाखवून आपला चेहरा लपवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. तो फोटो शेअर करताना तिने, फ्लॉवर, फ्लॉवर फ्लॉवर .. थोड्या सकारात्मकतेसह काही फुलं हवेत .. आनंद .. आशा आणि प्रेम,"असे कॅप्शन दिले आहे.

अभिनेता रोनित रॉय: गोवा इतका हतबल कधी पाहिला नव्हता             

अफेअरबद्दल व्यक्त केले होते मत
रश्मिका आणि विजय देवरकोंडाच्या अफेअरच्या बातम्या येतच असतात. दोघेही या बातम्यांकडे दुर्लक्ष करतात आणि एकमेकांचे चांगले मित्र आहे म्हणून सांगत असतात. विजय आणि रश्मिका बर्‍याचदा एकत्र दिसतात.

कामाबंद्दल बोलायचं झालं तर रश्मिका अल्लू अर्जुन सोबत पुष्पा या चित्रपटात दिसणार आहे. हा अल्लू अर्जुनचा पहिला पैन इंडिया चित्रपट असणार आहे. चाहते या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्याचबरोबर मिशन मजनू या चित्रपटाद्वारे रश्मिका बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे. या सिनेमात ती सिद्धार्थ मल्होत्रा ​​सोबत दिसणार आहे. याशिवाय रश्मिका अमिताभ बच्चन यांच्यासमवेत ‘अलविदा’ चित्रपटात दिसणार आहे. जेव्हा या चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले तेव्हा तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन ही माहिती दिली.

 

संबंधित बातम्या