मालदिवचे फोटो शेअर करणाऱ्या बॉलिवूड कलाकारांना नवाजचा खोचक टोला

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 24 एप्रिल 2021

अनेक सेलिब्रिटी सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी बाहेर गेले आहेत.

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागला आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण येत चालला आहे. यातच महाराष्ट्रात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्यांमुळे एका आठवड्याचा लॉकडाऊन लावण्यात आला आहे. त्यामुळे अनेक चित्रपटांचे चित्रीकरण देखील थांबवण्यात आलं आहे. या सर्व गोष्टी पाहता अनेक सेलिब्रिटी सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी बाहेर गेले आहेत. हे पाहता अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने (Nawazuddin Siddqui) या सगळ्यांवर निशाणा साधला आहे. (Nawaz slaps Bollywood actors for sharing photos of Maldives)

माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत, ‘नवाजुद्दीन सिध्दीकीला बॉलिवूड सेलिब्रिटींच्या  (Bollywood Celebrity) सुट्टी आणि तिथून शेअर करत असलेल्या फोटोंबद्दल विचारण्यात आल्यांनतर, यावर बोलताना नवाज म्हणाला, देशातील लोकांकडे खाण्यासाठी अन्न नाही पण आपण वायफळ खर्च करत आहोत. थोडी तरी लाज वाटू द्या.’

Manoj Bajpai Birthday: गावात थिएटर नसतांना बघितलं होतं अभिनेता होण्याचं स्वप्न

यावर पुढेही तो म्हणाला, ‘ते लोक कशाबद्दल बोलतील?  ते अभिनयाबद्दल बोलतील? त्यांनी मालदीवचा (Maldives) तमाशा बनवला आहे. त्यांच्या पर्यटनाची काय व्यवस्था आहे ते मला माहीत नाही. परंतु एक माणूस म्हणून कृपया आपल्या सुट्टीचे फोटो तरी आपल्याकडे ठेवा सोशल मिडियावर शेअर करु नका. इकडे देशातील प्रत्येक व्यक्ती कोरोना सारख्या महामारीचा सामना करत आहे. कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस प्रचंड प्रमाणात वाढत आहे. जो आधीच अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे, हे फोटो दाखवून त्यांना आणखी दुख: देऊ नका.’

पुढे नवाज म्हणाला, ‘आपण एक कलाकार म्हणून मोठं होणं आवश्यक आहे. त्यामुळे मालदिवच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी जाण्याची आपली कोणतीच योजना नाही. मी माझ्या कुटुंबासमवेत माझ्या मूळ गावी बुधाणामध्ये आहे. हेच माझं मालदिव आहे.'

संबंधित बातम्या