Nayanthara Wedding : नयनताराने शेअर केला लग्नानंतरचा पहिला फोटो

Nayanthara Age : 6 वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर साऊथची टॉप अभिनेत्री नयनतारा आणि दिग्दर्शक विघ्नेश शिवन यांनी लग्न केले असून लग्नानंतर नव्या वधू-वरांचे फोटोही समोर आले आहे.
Nayanthara Wedding : नयनताराने शेअर केला लग्नानंतरचा पहिला फोटो
Nayanthara WeddingDainik Gomantak

6 वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर साऊथची टॉप अभिनेत्री नयनतारा आणि दिग्दर्शक विघ्नेश शिवन यांनी लग्न केले असून लग्नानंतर नव्या वधू-वरांचे फोटोही समोर आले आहे. नयनताराने तिच्या इंस्टाग्रामवर लग्नानंतरचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये वधू बनलेली नयनतारा खूपच सुंदर दिसत आहे.

Nayanthara Wedding
गरोदरपणातही 'मसक्कली'ची बोल्ड अदा बघून चाहते घायाळ

हे छायाचित्र फेऱ्यांच्या मंडपाचे आहे, ज्यामध्ये वर नयनताराच्या कपाळाचे चुंबन घेताना दिसत आहे, तर नयनतारानेही विघ्नेशचा हात पूर्ण प्रेमाने धरला आहे. पारंपरिक लूकमध्ये ही जोडी खूपच सुंदर दिसत आहे.

नयनतारा लाल रंगाच्या लेहेंग्यात खूप सुंदर दिसत आहे, तर तिने कुंदन ज्वेलरी घातली होती ज्यामध्ये ती राणीसारखी दिसते. फोटो शेअर करत नयनताराने लिहिले - देवाच्या कृपेने, आमच्या आई-वडिलांचे आणि जिवलग मित्रांचे आशीर्वाद...एक नवीन सुरुवात.

लग्नापूर्वी नयनतारा आणि विघ्नेश शिवन यांनी एकमेकांना 6 वर्षे डेट केले होते. दोघांनी आधी एकमेकांना नीट समजून घेतलं आणि मग नात्याला नाव द्यायचं ठरवलं. दोघांनी गेल्या वर्षी एंगेजमेंट केली होती, त्यानंतर आता त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.

साऊथचा सुपरस्टार रजनीकांतपासून बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानपर्यंत या हायप्रोफाईल लोकांनी लग्नाला हजेरी लावली होती. महाबलीपुरममधील एका रिसॉर्टमध्ये झालेल्या या लग्नात इतरही अनेक नामांकित सेलिब्रिटी पोहोचले होते.

नयनतारा लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. अॅटलीज जवानमध्ये ती शाहरुख खानसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com