कॉमेडियन भारती सिंहच्या घरी 'एनसीबी'चा छापा; अंमली पदार्थांबाबत अद्याप खुलासा नाही

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 21 नोव्हेंबर 2020

भारती सिंहच्या मुंबईतील लोखंडवाला येथील घरात छापा हा छापा मारण्यात आला. यात अंमली पदार्थ आढळून आले किंवा नाही याबाबत अद्याप खुलासा करण्यात आलेला नाही.   

 मुंबई- अंमली पदार्थांची पाळेमुळे शोधून काढण्यासाठी एनसीबीकडून पुन्हा एकदा मुंबईमधील अंधेरी वर्सोवा भागात छापा मारण्यात आला. कॉमेडियन भारती सिंहच्या मुंबईतील लोखंडवाला येथील घरात छापा हा छापा मारण्यात आला. यात अंमली पदार्थ आढळून आले किंवा नाही याबाबत अद्याप खुलासा करण्यात आलेला नाही.   

याआधीच अनेक बॉलिवूडमधील अनेकांच्या घरी मारण्यात आले आहेत. सुशांत सिंहच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमध्ये अंमली पदार्थांचं रॅकेट असल्याची चर्चा सर्वत्र होत होती. यानंतर हे प्रकरण गांभीर्याने घेत अंमली पदार्थ विरोधी पथकाने याबाबत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी तसेच बॉलिवूड  कनेक्शन असलेल्यांच्या घरी छापे मारले. बॉलिवूडमधील चित्रपट निर्माता फिरोज नाडियावाला यांच्या घरी नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने छापा मारून त्यांच्या घरून अंमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. अलिकडेच अभिनेता अर्जून रामपाल आणि त्याच्या प्रेमिकेचीही कसून चौकशी करण्यात आली होती.  

 बॉलिवूडची स्टार अभिनेत्री दीपिका पादुकोण माजी व्यवस्थापक करिश्माचीही एनसीबीने चौकशी केली होती. सप्टेंबरमध्ये ही चौकशी करण्यात आली होती. अभिनेत्री श्रद्धा कपूर, साराअली खान यांचीही चौकशी करण्यात आली होती. तपासासाठी त्यांचे फोनही जप्त करण्यात आले होते. ड्रग्सप्रकरणामुळे गेल्या काही महिन्यांपासून बॉलिवूड ढवळून निघाले आहे.  

संबंधित बातम्या