अर्जुन रामपालची सात तास चौकशी

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 14 नोव्हेंबर 2020

केंद्रीय अंमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) शुक्रवारी अभिनेता अर्जुन रामपालची सात तास चौकशी केली. बॉलिवूड अंमली पदार्थ साखळीप्रकरणी ही चौकशी करण्यात आली.

मुंबई  : केंद्रीय अंमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) शुक्रवारी अभिनेता अर्जुन रामपालची सात तास चौकशी केली. बॉलिवूड अंमली पदार्थ साखळीप्रकरणी ही चौकशी करण्यात आली. याप्रकरणी अर्जुनच्या प्रेयसीचीही दोन वेळा चौकशी करण्यात आली असून, त्याच्या परदेशी मित्रालाही याप्रकरणी एनसीबीने अटक केली आहे.

आज  सकाळी अर्जुन रामपाल एनसीबी कार्यालयात दाखल झाला. या ड्रग्सबद्दल काहीही माहिती नसल्याचे त्याने सांगितले. यापूर्वी त्याची प्रेयसी गॅब्रिएला डेमेट्रियड्‌स हिची एनसीबीने दोन वेळा चौकशी केली. अर्जुनलाही चौकशीसाठी समन्स पाठवण्यात आले होते. त्याला शुक्रवारी सकाळी अकरा वाजता चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले होते. त्याच्या घरावर सोमवारी एनसीबी पथकाने छापा टाकला होता. यापूर्वी अर्जुनची प्रेयसी गॅब्रिएला डेमेट्रियड्‌स हिचा भाऊ ऍजिसिलाऊस डेमेट्रीऍडेट्‌सला एनसीबीने अटक केली आहे. लोणावळा येथे डेमेट्रिऍडेट्‌स राहत असलेल्या घरावर छापा टाकला. तेथे तो त्याच्या प्रेयसीसोबत राहत होता. त्याच्याकडून ०.८ ग्रॅम चरस जप्त करण्यात आले होते. त्यानंतर डेमेट्रिऍडेट्‌सला खार येथील घराचीही झडती घेण्यात आली. तेथे अलफ्रॅझोलन गोळ्यांची एक स्ट्रीप सापडली होती.

संबंधित बातम्या