Neena Gupta: 'सशक्त महिलांना स्क्रीनवर योग्यप्रकारे प्रेझेंट केले जात नाही'

Neena Gupta
Neena Gupta

या महिन्याच्या 4 तारखेला अभिनेत्री नीना गुप्ता(Neena Gupta)  62 वर्षाच्या झाल्या. अभिनेत्री नीना गुप्ता यांनी आपल्या अथक प्रयत्नांनी स्वप्न पूर्ण केले आणि एक यशस्वी अभिनेत्री(actress) म्हणून चित्रपट जगात(bollywood) आपले पाउल रोवले आहे. अजूनही त्यांच्यात अभिनय करण्याचा उत्साह दिसतो. त्याच्यातील कलाकार नेहमीच नवीन पात्र स्विकारण्यास उत्सुक असतो. आता आपल्या कारकीर्दीच्या 39 व्या वर्षात, त्यांना एका चित्रपटात टायटल रोल करण्याची संधी मिळाली. त्यांच्या पहिल्या चित्रपटात नीना गुप्ता यांना कोणते अनुभव आलेत, कारकीर्दीतील सर्वात मोठी चूक आणि आता त्यां नवीन कलाकारांना काय सल्ला देतात? या विषयी आज आपण जाणून घेणार आहोत. या सर्व विषयांवर नीना गुप्ता यांनी ‘अमर उजाला’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये  चर्चा केली आहे.

एखाद्या चित्रपटाच्या पोस्टरवर ​​नाव पाहून तुम्हाला आनंद थर झाला असेल तेव्हा तुमची काय प्रतिक्रिया होती?

एक दिवस माझा मॅनेजर माझ्याकडे आला आणि म्हणाला की एक रोल आहे 90 वर्षांच्या म्हाताऱ्या महिलेची. निखिल अडवाणी या चित्रपटाचे निर्माता आहेत. मी म्हणाले  वेडा आहेस का? मी का 90 वर्षांच्या महिलेचा रोल करोयचा? माझ्याकडे आता वेळ आहे. तर तो म्हणाला की, तूम्ही आधी कथा ऐका. आपल्याला आवडली नसल्यास नकार द्या.  आता देवाचे आभार मानते की मी त्याचे तेव्हा ऐकले. मी गेले. चित्रपटाचे दिग्दर्शक काश्वी नायर यांनी मला या चित्रपटाची कथा सांगितली आणि ही कथा पूर्ण होताच मी कधी शूट करायचे ते विचारले.

अभिनयासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळवलेल्या 'वो छोकरी' चित्रपटापासून तुम्ही आत्तापर्यंत सर्व दमदार भूमिका केल्या आहेत, त्या बद्दल काय सांगाल?

सुरुवातीपासूनच चित्रपट सृष्टात सशक्त महिला होत्या. मात्र सशक्त महिलांची योग्य प्रकारे निवड केली गेली नाही. चित्रपट आणि टीव्हीमध्ये सशक्त स्त्री पात्रांचे वर्णन केले गेले नाही. आता एक दोन गोष्टी हिट झाल्यानंतर, लोकांना प्रयोग करण्याचे धाडस झाले आहे. नव्या विषयांवर चित्रपट बनत आहेत. माझ्या वयाच्या कलाकारांनाही चांगले प्रोजेक्ट मिळत आहेत. 'पंचायत' मधील माझे पात्र सशक्त स्त्रीचे नाही. 'मसाबा मसाबा' मध्ये मी एकटीच होती. मी भाग्यवान आहे की मला या वयात चांगले रोल मिळतात. चित्रपटाचे नाव पहिल्यांदाच माझ्या व्यक्तिरेखावर ठेवले गेले आहे. माझ्या आयुष्यात याआधी असे कधी झाले नव्हते.

रमण कुमार, विनोद पांडे, कुंदन शाह, श्याम बेनेगल आणि शशी कपूर या दिग्दर्शकांसोबत काम केल्यानंतर काश्वीसारख्या नव्या पिढीच्या दिग्दर्शकांसोबत काम करण्यात काय काय वेगळा अनुभव  आला?

आपण दिलेल्या घेतलेल्या एकूण नावांपैकी केवळ काश्वींनी मला मुख्य भूमिका दिली आहे. आता काळ खूप बदलला आहे. दिग्दर्शक खूप वेगळ्या पद्धतीने विचार करतात. श्याम बेनेगलच्या चित्रपटात मी कधीही मुख्य भूमिका केली नव्हती. सर्व मुख्य भूमिका शबानाकडे जात होत्या, स्मिताकडे जात होते, जे काही लहान रोल होते ते दीप्तीला दिले जात होते. 'साथ साथ' चित्रपटात माझ्याकडून झालेली सर्वात मोठी चूक, मला सांगायची आहे जेणेकरुन इतर लोक ती चूक करू नयेत.

कोणत्याही नायिकेने करिअरच्या सुरूवातीस कधीही लुल्लिंग गर्ल किंवा कॉमेडी करू नये. यानंतर तुम्हाला नायिकेचा दर्जा कधी मिळणार नाही. गिरीश कर्नाड जेव्हा 'साथ साथ' चित्रपटाच्या प्रीमिअरच्या वेळी आले तेव्हा ते म्हणाले की आपण आता तुझं काहीही होऊ शकत नाही. आता तुला चित्रपटात मुख्य भूमिका कोणी देणार नाही. आता तू कधी नायिका होणार नाहीस. आणि नेमके तेच घडले. 'जाने भी दो यारों'मध्येही भक्ती बर्वेची भूमिका मला मिळाली नाही. होय, पण मला अजूनही आठवतं की पंकज कपूरच्या सेक्रेटरीची तुमची भूमिका खूप चांगली होती.

ते आणखी चांगले होते. यात माझी आणि रवि वासवानी यांचा एक ट्रॅक होता जो सुरुवातीला चित्रपटाच्या लांबीमुळे काढला गेला होता. पण लीड हिरोईन भक्ती बर्वे होती, आता वेळ बदलली आहे. यंग डायरेक्टर येत आहेत आणि ते थीम्सवर प्रयोग करत आहेत. आम्हाला चांगले रोलही मिळत आहेत. वेळ थोडा बदलला आहे आणि मला आनंद आहे की मीअसतांनाच हा वेळ आणि काळ बदलला आहे. माझ्याकडे चांगले प्रोजेक्ट आहेत. शुटिंग लवकर सुरू होण्याची मी वाट बघत आहे.

तुमचा संदर्भ बहुधा अमिताभ बच्चन यांच्या 'गुडबाय' चित्रपटाचा आहे, ते बरीच तयारी करून सेटवर जातात, त्यांच्याबरोबर पहिला सीन करतांना तुमची तयारी काय आहे?

चित्रपटाचे शूटिंग सुरू होण्यापूर्वी आम्ही फोटोशूट केले. म्हणून त्याच्यासोबत खूप गप्पा झाल्या त्यामुळे जो एक संकोच होता तो आता दूर झाला. मला असं वाटतं की समोर प्रोफोशनल अभिनेता असतो तेव्हा काही करण्याची गरज नसते. जर एखादा अनुभव नसलेला अभिनेता असेल ज्याला काहीच माहित नसते, तर तीथे एक समस्या निर्माण होते. अमिताभ बच्चन सारख्या अभिनेत्यासमोर थोडासा संकोच वाटतो, की मी कसे करणार, काय बोलणार, कसा सीन करत आहे, परंतु एकदा तुम्ही सेटवर पोहोचल्यावर सीन सुरू केला की मग तुम्हाला काहीच वाटत नाही. मग सर्वकाही नॉर्मल होत जाते. 


 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com