स्ट्रीमफेस्टच्या माध्यमातून नॉन सबस्क्राइबर्सना नेटफ्लिक्‍स दोन दिवस पुरविणार विनामूल्य सेवा

दैनिक गोमन्तक
रविवार, 6 डिसेंबर 2020

"नेटफ्लिक्‍स''ने आपले भविष्यातील सबस्क्राइबर्स वाढविण्यासाठी आज (ता. ५) आणि उद्या (ता. ६) भारतात "स्ट्रीमफेस्ट''चे आयोजन केले आहे

मुंबई: "नेटफ्लिक्‍स''ने आपले भविष्यातील सबस्क्राइबर्स वाढविण्यासाठी आज (ता. ५) आणि उद्या (ता. ६) भारतात "स्ट्रीमफेस्ट''चे आयोजन केले आहे. या स्ट्रीमफेस्टच्या माध्यमातून नॉन सबस्क्राइबर्सना नेटफ्लिक्‍स दोन दिवस विनामूल्य सेवा पुरविणार आहे. याचा पुरेपूर फायदा प्रेक्षक उचलताना दिसत आहेत; मात्र यामुळे ओटीटी प्लॅटफॉर्मवर विनामूल्य सेवा देण्याची स्पर्धा अधिक तीव्र होणार असल्याचे दिसते आहे. अन्य प्लॅटफॉर्मही असेच एखादे पाऊल उचलून आपले सबस्क्राइबर्स वाढविण्याचा प्रयत्न भविष्यात नक्कीच करतील, अशी चिन्हे आहेत.

गेल्या तीन-चार वर्षांत आपल्या देशात ओटीटी प्लॅटफॉर्म हे एक प्रभावी माध्यम तयार झाले आहे. सध्या नेटफ्लिक्‍स, ऍमेझॉन प्राईम, हॉटस्टार, सोनी लिव्ह, झी 5, वूट असे विविध ओटीटी प्लॅटफॉर्म्स उत्तमोत्तम कलाकृती निर्माण करून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याच्या शर्यतीत उतरले आहेत. या शर्यतीत पुढे जाण्यासाठी प्रत्येक जण नवनवीन कल्पना वापरताना दिसतात. 

लॉकडाऊनच्या काळात हे माध्यम अधिक सशक्त झाले. अनेक हिंदी चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाले. त्यामुळे एक प्रकारची स्पर्धा पाहायला मिळाली. त्यातच आता नेटफ्लिक्‍सने आपले भविष्यातील सबस्क्राइबर्स वाढवण्यासाठी भारतात दोन दिवस "स्ट्रीमफेस्ट''चे आयोजन केले. या स्ट्रीमफेस्टच्या माध्यमातून नॉनसबस्क्राइबर्सना नेटफ्लिक्‍स दोन दिवस विनामूल्य सेवा पुरविणार आहे. याचा पुरेपूर फायदा प्रेक्षक उचलताना दिसत आहेत. 

संबंधित बातम्या