वहिनीसाहेबांच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 29 जानेवारी 2021

'तुझ्यात जीव रंगला' या छोट्या पडद्यावरील मालिकेतून घराघरात पोहचलेली वहिनीसाहेब अर्थात धनश्री काडगांवकर हिने गोड बातमी दिली आहे.

मुंबई: 'तुझ्यात जीव रंगला' या छोट्या पडद्यावरील मालिकेतून घराघरात पोहचलेली 'वहिनीसाहेब' अर्थात धनश्री काडगांवकर हिने गोड बातमी दिली आहे. धनश्रीच्या घरी एका गोंडस बाळाचं आगमन झालं आहे. धनश्रीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपल्या तमाम चाहत्यांना ही आंनदाची बातमी दिली. त्या सोबतच माझी आणि बाळाची प्रकृती छान असल्याचही यावेळी तिने सांगितले. धनश्रीला एक गोंडस मुलगा झाला असून रात्री उशिरा सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना गूडन्यूज दिली आहे.

'New life....new chapter ' असं गोड कॅप्शन पोस्ट शेअर करताना दिले. "ही गोड आंनदाची बातमी शेअर करताना मला खूप आंनद होत आहे. पहाटेच आमच्या घरी एका गोंडस बाळाचं आगमन झालं आहे. माझी आणि बाळाची प्रकृती अत्यंत स्वस्थ आहे. आम्हाला खूप प्रेम आणि आशिर्वाद दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद" अशी पोस्ट धनश्रीने सोशल मीडियावर शेअर केली. पोस्ट शेअर करताच चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
दरम्यान धनश्रीने बाळंतपणात खूप एन्जॉय केला असल्याचं म्हटलं जातं आहे. या बाळंतपणाच्या काळात धनश्रीने खूप फोटो शूट केले. त्यामुळे ती  खूप चर्चेत सुध्दा होती. आणि आपण आई होणार असल्याची गोड बातमी धनश्रीने एक सुंदर व्हिडिओ शेअर करत दिली होती. तुझ्यात जीव रंगला या मालिकेने धनश्रीला खऱ्या अर्थाने ओळख दिली. आपल्या सुंदर अभिनयाने ती 'वहिनीसाहेब' म्हणून महाराष्ट्राच्या घराघरात पोहचली.

संबंधित बातम्या