अक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी’ चा नवा विक्रम

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 3 एप्रिल 2021

चित्रपटाला संपूर्ण भारतामधून 63 मिलियन व्ह्यूअर्स मिळाले असून गेल्या पाच वर्षामधील सर्वाधिक व्ह्यूज मिळालेला चित्रपट ठरला आहे.

मुंबई: बॉलिवूडमधील प्रसिध्द अभिनेता अक्षय कुमारचा 'लक्ष्मी' चित्रपट काही दिवसांपूर्वी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये अक्षय सोबत कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत दिसली होती. आता या चित्रपटाने टीव्ही जगतात नवा विक्रम नोंदवला आहे. 21 मार्च रोजी 8 वाजता स्टार गोल्ड वाहीनीवर या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हीजन सोहळा पार पडला. त्यावेळी या चित्रपटाला संपूर्ण भारतामधून 63 मिलियन व्ह्यूअर्स मिळाले असून गेल्या पाच वर्षामधील सर्वाधिक व्ह्यूज मिळालेला चित्रपट ठरला आहे.

तसेच स्टार गोल्डच्या वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियरने पुन्हा एकदा नवा विक्रम नोंदवला आहे. अक्षय कुमारचा लक्ष्मी हा  चित्रपट गेल्या पाच वर्षामध्ये सर्वाधिक रेटींग मिळवणारा चित्रपट ठरला असून आता सर्वाधिक व्हूज मिळालेला चित्रपट ठरला आहे. (New record of Akshay Kumars Lakshmi)

रोहमन शॉलने सुष्मिता सेनला केली कमेंट म्हणाला, 'सुसंगततेचा प्रभाव'

अक्षय कुमारचा 'लक्ष्मी बॉम्ब' चित्रपट हा तमिळ चित्रपट 'कंचना' या चित्रपटाचा रिमेक आहे. हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये एका ट्रान्सजेंडर भूताने अक्षय कुमारच्या शरीराच ताबा मिळवलेला असतो. राघवा लॉरेन्सने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तसेच ओटीटी प्लॅटफॉर्म वितरकांनी लक्ष्मी चित्रपटाचे 125 कोटी रुपयांना हक्क खरेदी केल्याचे म्हटले जात होते. लक्ष्मी चित्रपट ऑस्ट्रेलिया, य़ूएई, न्यूझीलंड या देशामध्येही प्रदर्शित करण्यात आला आहे. त्याचबरोबर कॅनडा, अमेरिकेमधील प्रेक्षकांसाठी हॉटस्टारवर हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आहे. 
 

संबंधित बातम्या